पुणे: सौरभ त्रिपाठी हा सध्या विनर कंपनीत कार्यरत आहे.शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज हे सध्या विनर कंपनीकडे आहे. या कंपनीकडून उत्तर प्रदेशात घेण्यात आलेल्या परीक्षा देखील वादग्रस्त ठरल्या होत्या. टीईटीच्या 2018 परीक्षांमध्येही जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मॅनेजर आश्विन कुमार व महाराष्ट्र राज्य परीक्षा पतिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे याला काल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे 500 परिक्षार्थींचे प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये स्वीकारून जमा झालेले पैसे आपसात वाटून घ्यायचे. खोटा निकाल प्रसिद्ध करून मूळ निकालाच्या यादीतही त्यांच्याकडील परीक्षार्थींची नावे घुसवुन तेच पात्र असल्याचे दाखवले जात होते. यामुळे प्रामाणिक परीक्षार्थींची व शासनाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.
TET exam scam: जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या अजून एका संचालकाला अटक - सौरभ त्रिपाठी
टीईटी (TET exam ) शिक्षक पात्रता परीक्षेत (Teacher Eligibility Test) पुणे पोलिसांच्यावतीने (Pune Police) कारवाई सुरू आहे. टीईटीच्या 2018 परीक्षेतही घोटाळा झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या संदर्भात सायबर पोलीसांनी (Cyber Police) जी ए सॉफ्टवेअरच्या (GA Software) आणखी एक संचालक सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) याला अटक केली आहे.