ETV Bharat / state

बारामती तालुक्यातील टोळीवर तडीपारीची कारवाई - Baramati Police News

चोरी व घरफोड्या करणाऱ्या तिघांना बारामती व इंदापूर तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सदर आरोपींना पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

tadipari-action-against-gang-in-baramati-taluka
बारामती तालुक्यातील टोळीवर तडीपारीची कारवाई
author img

By

Published : Dec 22, 2020, 10:02 PM IST

बारामती - स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून टोळीची दहशत निर्माण करून चोरी व घरफोड्या करणाऱ्या तिघांना बारामती व इंदापूर तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रकाश ऊर्फ प्रशांत चंद्रकांत लोंढे (वय २६ वर्षे), सुनिल बाळासोब माकर (वय २७ वर्षे), अजय दत्तात्रय मांढरे (वय २५ वर्षे, सर्व रा. उंडवडी सुपे, ता. बारामती) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Tadipari action against gang in Baramati taluka
बारामती तालुक्यातील टोळीवर तडीपारीची कारवाई

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी स्वतःच्या आर्थिक प्राप्ती साठी चोरी, घरफोडी यासारखे गुन्हे करतात. आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांची टोळी निर्माण केली आहे. या टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारीच्या कृत्यास व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक बेरोजगार तरुण मुले अशा कृत्यांमुळे या टोळीकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

तडीपारीचा आदेश -

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, यांनी विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यामार्फत सदर आरोपींना तडीपार करण्याबाबत पोलीस डॉ.अभिनव देशमुख यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार चौकशी अहवाल, गोपनीय साक्षीदार जबाब, अभिलेखावर असलेल्या गुन्ह्यांचे देशमुख यांनी सदर आरोपींना पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

यांनी केली कारवाई -

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते. विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.