पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 27 मे रोजी घडलेल्या गुन्ह्यातील काही आरोपी हे तोंडाला रुमाल, मास्क घालून तर काही आरोपी तोंड लपवत डोक्यावर टोपी परिधान करून, रात्रीच्या वेळी हल्ला करीत असल्याचे दिसून आले. त्यांची ओळख व गाड्याचे नंबर ओळखणे अतिशय अवघड झाले होते. हे सगळे आरोपी इंस्टाग्राम व्हाट्सअपच्या कॉलिंगद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचण येत होती. परंतु स्वारगेट पोलिसांनी पतपास करून अखेर आरोपींना अटक केलेली आहे.
आरोपींना अटक : अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे (वय वीस वर्ष धंदा रोजंदारी) राजेंद्र नगर, दत्तवाडी पुणे आणि दुसरा आरोपी हा अभिषेक शिवाजी रोकडे (वय 22 वर्षे धंदा बेरोजगार) नांदेड गाव, या ठिकाणी राहणारे आहेत. त्यामध्ये आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते विधी संघर्ष बालक असून त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाला आहे. या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी वापरण्यात आलेल्या एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतुसे, तीन कोयते, चार दुचाकी गाड्या, तीन मोबाईल फोन असा दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
जमिनीच्या वादातून हल्ला : घडलेला प्रकार हा जमिनीच्या वादातून झाला असल्याचे समोर आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. यामध्ये या अल्पवयीन मुलांना आणि या दोन आरोपींना सुपारी देऊन पत्रकारावर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. हे सगळे आव्हानात्मक असताना आम्हाला ते सापडलेले आहेत. पुढील तपास चालू असल्याचे पाटील यांनी म्हटलेले आहे.
पोलीस पथक : ही कामगिरी रितेश कुमार सा. पोलीस आयुक्त, प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर. मा. नारायण शिरगावकर साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पोहवा मुकुंद तारु, पोशि सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख दिपक खंदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.
हेही वाचा :