पुणे : राज्यात शिंदे फडवणीस सरकार ( Shinde Fadwanis Government ) आल्यानंतर, जिल्हा नियोजन समितीच्या ( District Planning Committee) कामाला आधीच्या सरकारने दिलेली मान्यता, जशीच्या तशी न देता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यामुळे आधीच्या सरकारच्या कामांना हे सरकार स्थगिती देत आहे. विकासात अडथळा आणत आहे. अशी टीका सर्व विरोधी पक्षाकडून केली जात होती.
अजित पवार यांनी सुचवलेल्या कामांना कात्री : पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्याने सर्वच कामांना स्थगिती दिली जाणार नाही असे म्हटले होते. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जिल्हा नियोजन समितीच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मान्यता दिली. त्यात माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. यावरून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा वाद रंगण्याची शक्यता आहे. अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 40 टक्के निधी एकट्या बारामती तालुक्याला दिला होता. त्यात बारामतीतील रस्ते नगरपालिकेची इमारत कालव्याची कामे, यांचा समावेश होता. बारामती २४५ कोटीच्या कामांना चंद्रकांत दादा पाटील यांनी पालकमंत्री म्हणून स्थगिती दिलेली आहे.
303 कोटीच्या देण्यात आली कामांना मंजुरी : जिल्ह्यातील नवीन विकासाच्या दृष्टीने आवश्यक 303 कोटीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. 5, 6तारखेला त्याचे पुस्तक तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला जी खीळ बसली होती. ती आता उठली आहे. हा पहिला टप्पा 6 तारखेला आणखी 200 कोटीच्या कामांना मान्यता दिली जाणार आहे. आता लवकर मान्यता द्यावी लागणार आहे. तरच 31 मार्च आत कामे पूर्ण होतील .यात सुमारे 4300 प्रकारचे कामे आहेत. त्यात रस्ते, समशानभूमी, शाळा इमारती, शहरातील दलित वस्ती, आदिवासी भागातील रस्ते आहेत. असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे.
गावाच्या विकास कामांनाही मान्यता देण्यासाठी निधी शिल्लक : मान्यता दिलेल्या कामाची यादी पाहिल्यावर विरोधक आमदारांनाही आनंदाचा धक्का बसेल अशी मान्यता दिलेली आहे. यात कोणतेही राजकारण केले नाही. सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनाही जिल्ह्यातील विकास कामे सुचवली होती नव्या सरकारमधील शिवसेना भाजपच्या नेत्यांनी कामे पडताळून ती जोडले आहेत. नव्याने सुचविलेल्या गावाच्या विकास कामांनाही मान्यता देण्यासाठी निधी शिल्लक असतो. त्याचा वापर केला आहे. यातून दोन्हीकडील नेत्याचे समाधान होईल असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.