पुणे: प्राप्त माहितीप्रमाणे, पुण्यात विश्वनाथ कराड यांचे नामवंत असे कॉलेज आहे. एमआयटी कॉलेजची खूप मोठी ख्याती आहे. या कॉलेजमध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांसोबत अतिशय अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. येथील कर्मचाऱ्यांनी याविरुद्ध युनियन तयार केली. त्यामुळे याचा राग मनात धरून कॉलेज प्रशासनाकडून कर्मचाऱ्यावर खोटे आरोप लावण्यात आले. यासह ऑफिसमध्ये घुसून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. त्यातील सहा ते सात कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आले, कुणाची बदली करण्यात आली आहे, तर कुणाला कारणे दाखवा नोटीस दिली गेली. संस्थेने केलेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
तर आंदोलनाचा इशारा: एमआयटी कॉलेजमधील कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली जात नाही किंवा कुठलेच भत्ते भेटत नाहीत. 20 ते 21 वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा संस्था विचार करत नाही. या अन्यायाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मनात राग धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ एमआयटी कॉलेज प्रशासनाकडून आणण्यात येत आहे. त्यामुळे आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
वरिष्ठांना अंधारात ठेऊन कारवाई: एकीकडे प्रसिद्ध असलेले एमआयटी कॉलेज आणि त्या कॉलेजमधले विद्यार्थ्यांची गुणवत्तेबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र नाव आहे. परंतु त्याच कॉलेजमधल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून अन्याय होत आहे. हा अन्याय जाणून बुजून केला जात आहे. कर्मचाऱ्यात फूट पाडून आम्हाला एकटे पाडून आमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. यावर विश्वनाथ कराड, राहुल कराड, मंगेश कराड यांनी लक्ष घालून आमची मागणी काय आहे. त्याचा विचार करावा. प्रशासन या सर्वांना अंधारात ठेवून आमच्यावर अन्याय करत असल्याची माहिती सर्व कर्मचाऱ्यांनी दिली.
|