पुणे : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विरोधात नोटीस पाठवून ही काहीच उत्तर न मिळाल्याने आता सुषमा अंधारे यांनी आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात संजय शिरसाठ यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.
शिरसाठ यांच्या विरोधात खटला दाखल: आज शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या बरोबर 47 वकिलांनी वकीलपत्र घेतले आहे. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी संविधान मानणारी आहे. मी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. नोटीस नंतर काही दिवसांच्या काळानंतर जेव्हा आम्हाला वाटले की, आताच न्यायालयाची पायरी चढायला पाहिजे. तेव्हा आम्ही दिवाणी आणि फौजदारी अश्या दोन्ही प्रकारचे दावे दाखल केले आहे. शिवाय 156 / 3 नुसार अजुन एक तक्रार दाखल केली आहे. बाई पणाचा विकटीम पुढे करणार नाही. महिलांवर बेताल वक्तव्य करणाऱ्याना धडा शिकवला पाहिजे. म्हणून आज आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून खटला दाखल केला आहे.
वादग्रस्त व्यक्तव्य केले होते: तसेच ते पुढे म्हणाले की, सत्तेत असणाऱ्या लोकांची मुजोरी ही या काळात चांगल्याच पद्धतीने अनुभवला मिळाली आहे. आम्ही पाठवलेल्या नोटीसला कोणताही उत्तर मिळालेले नाही. म्हणून ही लढाई वयक्तिक नव्हे तर राज्यातील महिलांच्या बाबतीमधील आहे. आमच्यावर दबाव तसेच आमिष देखील दाखवण्यात आली होती.असे देखील यावेळी अंधारे म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हे माझे भाऊ ते माझे भाऊ आहे असे म्हणत काय काय लफडी केलीत, ते तिलाच ठावूक असे वादग्रस्त व्यक्तव्य त्यांनी केले होते. यानंतर काही दिवस राज्यातील राजकारण हे चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.
सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका: या आधी शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी संभाजीनगर येथे एका सभेत बोलताना शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्याविरोधात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. या विरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यार असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा: Sanjay Shirsat Criticized Shushma Andhare सुषमा अंधारे विषय माझ्यासाठी संपला संजय शिरसाट