पुणे Lalit Patil Drugs Case : नुकतीच ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर हे ललित पाटीलवर उपचार करत असल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान, याच मुद्द्यावर बोलत असताना डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे : या संदर्भात प्रतिक्रिया देत सुषमा अंधारे म्हणाल्या की, पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगत होतो की ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन यांना सह आरोपी केलं पाहिजे.आता तर हे सिद्ध झालंय. असा कोणता आजार होता की 9 महिने ललित पाटीलवर उपचार सुरू होते. त्यामुळं आता गृह विभागानं ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी आमची मागणी असल्याचं त्या म्हणाल्या.
रजिस्टरमधील नोंदीवरुन तथ्य समोर : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात रोज नव-नवीन माहिती समोर येत आहे. ललित पाटील हा 9 महिने ससून हॉस्पिटल मध्ये हर्निया तसंच टीबीवर उपचार घेत होता. ललित पाटीलवर कोण उपचार करत होतं याची माहिती देण्यास आजपर्यंत डॉ. संजीव ठाकूर यांनी नकार दिला. ठाकूर यांनी गोपनीयतेच्या नावाखाली ही माहिती कोणालाच दिली नाही. पण ससूनमध्ये उपचारास दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे रजिस्टर आता समोर आलंय. तसंच रजिस्टरमधील नोंदीनुसार ललित पाटील याच्यावर हर्निया आणि टीबीच्या आजारासाठी उपचार सुरू होते आणि त्याच्यावर डॉ. संजीव ठाकूर उपचार करत होते हे स्पष्ट झालंय.
हेही वाचा -
- Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचे मराठवाडा कनेक्शन; कच्चा माल घेण्यासाठी पसरले जाळे, ससूनमधून पळाल्यावर थांबला संभाजीनगरात?
- Lalit Patil Case Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिकच्या सराफा व्यापाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक
- Nashik Drug Case: 25 कोटींचे एमडी ड्रग्स नाशिकहून साकीनाका पोलिसांनी केले जप्त...