ETV Bharat / state

Sushma Andhare : रामदास कदमांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राज्यव्यापी आंदोलन करणार - सुषमा अंधारे - Sushma Andhare

रामदास कदम यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. रामदास कदम यांना जशास तसे उत्तर देऊ आणि त्यांच्या विरोधात आता आंदोलनही होतील, असा इशारा जाता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला ( Sushma Andhare Warned Ramdas Kadam) आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेनेच्या मासाहेब मीनाताई ठाकरे याचबरोबर उद्धव ठाकरे, रश्मीताई ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टीका केली होती.

shivena
सुषमा अंधारे
author img

By

Published : Sep 21, 2022, 10:08 AM IST

पुणे - शिंदे गटाचे नेते रामदास कदम ( former minister Ramdas Kadam ) याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेनेच्या मासाहेब मीनाताई ठाकरे याचबरोबर उद्धव ठाकरे, रश्मीताई ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टीका केली. त्यामुळे रामदास कदम यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. रामदास कदम यांना जशास तसे उत्तर देऊ आणि त्यांच्या विरोधात आता आंदोलनही होतील, असा इशारा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला ( Sushma Andhare Warned Ramdas Kadam ) आहे.

राजकारणाची पातळी खालवली - ज्या मातोश्रीने तुम्हाला ओळख दिली, ज्या मातोश्रीने तुम्हाला अंगा खांद्यावर खेळून मोठे केलं, ज्या मासाहेबांच्या हातून तुम्ही पोहे खाल्ले, चहा पिला, ज्या बाळासाहेबांना मी खरा वारसदार आहे म्हणता मानसपुत्र आहे म्हणता, त्या बाळासाहेबांबद्दल त्या मासाहेबा बद्दल असे उद्गार काढणे हे तुमच्या लायकी दाखवून ( Ramdas Kadam criticize Thackeray family ) देते . तुम्ही त्याच लायकीचे आहात लायकी नसणाऱ्या माणसाला मातोश्रीने जास्त दिलं. राजकारणाची पातळी एवढी खालवली आहे. की कितीही कोणीही कुठल्याही स्तराला जाऊन टीका करत आहे. परंतु मातोश्री वरच्या मासाहेबांच्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेता एवढी तुमची हिमत झाली.आम्ही रामदास कदम यांना यापुढे महाराष्ट्रात फिरू देणार नाही. जशास तसे उत्तर देऊ जीभ सांभाळून बोला नाहीतर शिवसेना संयमी आहे परंतु भित्री नाही लक्षात ठेवा असा इशारा शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ( Sushma Andhare angry reaction to Ramdas Kadam ) दिलेला आहे.

सुषमा अंधारे

अतिशय घाणेरडे उद्गार - शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे माजी नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर रश्मी ठाकरे मासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल अतिशय घाणेरडे उद्गार काढलेले आहेत आणि याचा जवाब सगळ्या महाराष्ट्रातील माता भगिनी तुम्हाला विचारतीलच परंतु तुम्ही कुणाचे भाऊ आणि वडील सुद्धा म्हणण्याचे लायकीचे नाहीत इतके घाणेरडे शब्द तुम्ही वापरत आहात तुम्हाला बारा आमदारांची लिस्ट दिसत आहे आणि तुम्ही म्हणजे आहात तुम्हाला आमदारकी सुद्धा भेटण्यासाठी एवढं बोलावं लागतं हे दुर्दैव आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी गुहागरला तुम्ही पडलात पराभव झाला ते तुमच्यामुळे झाला तुमच्यामुळे मुंबईतल्या दोन जागा अड्जस्ट कराव्या लागल्या त्यामुळे मुंबईतल्या शिवसैनिकावर सुद्धा अन्याय झाला तुम्ही त्याची सुद्धा जाण ठेवली नाही इतके नालायक ही सेना असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.