ETV Bharat / state

काँग्रेसकडून सुरेखा पुणेकरांना उमेदवारी? पुण्यात बापट-पुणेकर सामना रंगणार..

पक्ष नक्की कोणाला उमेदवारी जाहीर करतोय, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असतानाच आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली आहे

सुरेखा पुणेकरांना मिळणार काँग्रेसकडून उमेदवारी?
author img

By

Published : Mar 29, 2019, 12:58 PM IST

पुणे - लोकसभा मतदारसंघ उमेदवारीसाठी अजूनही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार, अशी जोरदार चर्चा सध्या पुण्यात आहे. अरविंद शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे. मात्र अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण दिसून येत आहे, पक्ष नक्की कोणाला उमेदवारी जाहीर करतोय, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असतानाच आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली आहे.

सुरेखा पुणेकर यांनादेखील काँग्रेसकडून उमेदवारी बाबत विचारणा करण्यात आली होती. त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस वरिष्ठांच्या भेटी देखील घेतल्या असल्याची माहिती दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळवण्याचे आपले प्रयत्न आहेत. या निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे काँग्रेस श्रेष्ठींना देखील कळवले असल्याचे पुणेकर यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून विचारणा झालेली होती मात्र अद्याप उमेदवारीची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे अजून तरी काँग्रेसकडून अधिकृत रित्या काहीही सांगण्यात आलं नाही, मात्र आपण तयार असल्याचे सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

एकंदरीतच पुणे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवाराच्या बाबतचा तिडा आणखीच वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही काळात समोर आलेल्या नावांपैकी प्रवीण गायकवाड यांनी आपण उमेदवारीसाठी आता इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. तर काँग्रेसमधील इच्छुकांपैकी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांची नावे मागे पडली असताना गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे अनौपचारिकरीत्या सांगण्यात येत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अरविंद शिंदे यांच्या नावाची घोषणा होईल अशी चर्चा असताना देखील अद्यापही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसकडून काही वेगळा पत्ता खेळला जातो का? अशी चर्चा सुरू असतानाच आता सुरेखा पुणेकर देखील काँग्रेस इच्छुकांमध्ये असल्याचे समोर आले आहे.

Intro:mh pune 01 29 surekha punekaar congres icchuk av 7201348
Body:mh pune 01 29 surekha punekaar congres icchuk av 7201348

Anchor
पुढे लोकसभा मतदारसंघ यांच्या उमेदवारीसाठी अजूनही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा सध्या पुण्यात आहे अरविंद शिंदे यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे मात्र अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण दिसून येत आहे नक्की पक्ष कुणाला उमेदवारी जाहीर करतोय याची उत्सुकता काँग्रेसजनांना लागलेली असतानाच आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली आहे सुरेखा पुणेकर यांनादेखील काँग्रेसकडून उमेदवारी बाबत विचारणा करण्यात आली होती तसेच सुरेखा पुणेकर या दिल्लीला जाऊन काँग्रेस वरिष्ठांना भेटल्या देखील होत्या अशी माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळवण्याचे आपले प्रयत्न आहेत या निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे कॉंग्रेस श्रेष्ठींना देखील कळवला आहे त्यांच्याकडून विचारणा झालेली होती मात्र अद्याप उमेदवारीची प्रोसेस सुरू आहे त्यामुळे अजून तरी काँग्रेसकडून अधिकृत रित्या काहीही सांगण्यात आलं नाही मात्र आपण तयार असल्याचे सुरेखा पुणेकर म्हणाल्या त्यामुळे एकंदरीतच पुणे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवाराच्या बाबतचा तिडा आणखीनच वाढल्याचे दिसून येत आहे गेल्या काही काळात समोर आलेल्या नावांपैकी प्रवीण गायकवाड यांनी आपण उमेदवारी साठी आता इच्छुक नसल्याचे सांगितले आहे तर काँग्रेस मधील इच्छुकांपैकी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांची नावे मागे पडली असताना गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचे काँग्रेस जणांकडून अनौपचारिकरीत्या सांगण्यात येत होतं मात्र गेल्या दोन दिवसापासून अरविंद शिंदे यांच्या नावाची घोषणा होईल अशी चर्चा असताना देखील अद्यापही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही त्यामुळे काँग्रेसकडून काही वेगळा पत्ता खेळला जातो का अशी चर्चा सुरू असतानाच आता सुरेखा पुणेकर देखील काँग्रेस इच्छुकांमध्ये असल्याचे समोर आले आहे....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.