ETV Bharat / state

लोकसभा आणि विधानसभेचे विषय वेगळे, निकालाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही - सुप्रिया सुळे - लोकसभेचे विषय वेगळे

Supriya Sule On Assembly Election 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज स्पष्ट झाला आहे. चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपानं आघाडी घेतली आहे. मात्र विधानसभा आणि लोकसभेचे विषय वेगळे असतात. त्यामुळे या निकालाचा लोकसभा निवडणूक 2024 वर कोणताही परिणाम होणार नाही, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

Supriya Sule On Assembly Election 2023
खासदार सुप्रिया सुळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 2:41 PM IST

पुणे Supriya Sule On Assembly Election 2023 : चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं मोठी आघाडी घेतली असून भाजपा बहुमतार्यंत मजल मारत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडी आणि काँग्रेसची मोठी पीछेहाट झालेली आहे. यावर "जो जीता वही सिकंदर" अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. "2019 ला मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं, परंतु लोकसभेचे निकाल वेगळे आले होते. त्यामुळं या निकालाचा लोकसभेवर परिणाम होणार नाही. त्याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी थोडा वेळ लागेल, आम्ही नक्की आत्मपरीक्षण करू" अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे.

अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहा : खासदार सुप्रिया सुळे या आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या." वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांची लीडरशिप कशी यावर तिथले निकाल लागतात. स्थानिक प्रश्न वेगळे असतात, निश्चितपणानं याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आम्ही ते करू. पण अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहा." असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभेच्या 15 ते 16 जागा लढणार: सुप्रिया सुळे म्हणाल्या, "निवडणूक स्थानिक पातळीवर असते. अनेक निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढल्या गेल्या आणि एक्झिट पोल आपण पाहिले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकलं होतं, भाजपा हरलं. मात्र लोकसभेला वेगळं चित्र समोर आलं होतं. मध्यप्रदेशमध्ये त्यांनी 'लाडली' नावाची स्कीम चालली आणि शिवराज सिंह यांच्यामुळे भाजपाला फायदा झाला. तेलंगणामध्ये रेवंथ रेड्डी यांनी लीड घेतली हे खूप चांगलं आहे. एक स्कीम मध्यप्रदेशमध्ये चालली पण तेलंगणात नाही. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह यांची लीडरशिप दिसली. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या आम्ही 15 ते 16 जागा लढणार आहोत," अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

अजित पवारांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही : कर्जत इथल्या मेळाव्यात अजित पवार यांनी टीका केली, त्यावर मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझ्या पक्षाला आणि कुटुंबाला बांधील आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्यानं स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण बोलणं योग्य नाही. मी नियमित भ्रष्ट जनता पार्टीवर नेहमी टीका करते. अजित पवार गट आणि शिंदे गट यावर मी टीका करणार नाही. मात्र भाजपावर मी वैचारिक टीका करते, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

शरद पवार यांच्यावरच हेडलाईन होते : छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. याविषयी त्यांना विचारलं असता, त्यांनी "मला एका गोष्टीची गंमत वाटते. काहीही होऊ द्या, हेडलाईन ही नेहमी शरद पवार यांच्यावरच होते. जी काही भाषणं झाली त्यात 70 टक्के शरद पवार यांच्यावर टीका होती. विकासाचं काहीच नव्हतं, पॉलिसी काहीच सांगितली नाही. बारामती निवडणुकीमध्ये मला माहिती नाही, माझ्या समोर कोण उमेदवार आहे." असं उत्तर त्यांनी बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार का, या प्रश्नावर दिलं.

हेही वाचा :

  1. छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीत बोलावं, 'खोके' सरकारमध्ये स्पष्टता नाही - सुप्रिया सुळे
  2. विधानसभा निवडणूक 2023 ; पाच राज्यातील निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडं लोकांचा कल असल्याचं केलं स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.