पुणे : राज्यातून एक एक करून प्रकल्प हे वेगवेगळ्या राज्यात (shifting all projects in Maharashtra to Gujarat) चालले असून; यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टिका केली जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करत तत्काळ सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात यावे आणि राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पंतप्रधान यांची भेट घ्यावी, असा सल्ला दिला. राज्यात शिंदे सरकारच्या कामगिरी बाबत (criticized Shinde government) सुळे यांनी टोला लगावला आहे. तुमसे नाराज नहीं हैराण हू...नाराजीच्या पलीकडे हे सरकार पोहचलं आहे, असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यातील बारामती (Supriya Sule held a press conference in Baramati) हॉस्टेल येथे सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात चालले आहे. यावर सुळे म्हणाल्या की, राज्यातील मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दोन गोष्टी कराव्यात एक म्हणजे अधिवेशन बोलवावं आणि सर्व पक्षीय नेत्यांची यावर बैठक घ्यावी. हे प्रकल्प बाहेर जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच जीएसटीचं देखील मोठ नुकसान होत आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ देखील जाहीर करावा. एकमेकांवर आरोप केल्याने राज्यातील सर्वसामान्य नागरिक भरकटू लागला आहे. या ईडी सरकारने आत्ता मॅच्युरिटीने काम केलं पाहिजे, असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
राज्याचे मुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्री यांनी काल जो दावा केला आहे. त्याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाले की, हो हे बरोबर आहे की त्यांनी जो दावा केला आहे, त्या दाव्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंपन्या आल्या आहेत आणि ते तेव्हा सरकार मध्येच होते. गेली 7 वर्ष मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री हे ज्यांची ज्यांची सरकार होती. त्या सरकार मध्ये हे मंत्री होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या सरकारवर आरोप करत आहे, त्या सरकारमध्ये ते मंत्री होते तेव्हा ते का याबाबत बोलले नाही, असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
पुणे ते नागपूर 8 तासात प्रवास होणार आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यावर सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, त्यांनी याबाबत विचार केला असेल. नितीन गडकरी पारदर्शक पद्धतीने काम करतात, ते सर्वसमावेशक आहेत, सर्वांना सोबत घेऊन चालतात, ते पक्ष बघत नाही, ते सर्वांचे काम करतात असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
बच्चू कडू यांनी ज्या पद्धतीने शिंदे सरकारला अल्टिमेटन दिलेला आहे. त्यावर सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, बच्चू कडू उगाच आरोप करत नाहीत, सत्तेत असुनही ते संवेदनशील आहेत, याच मी मनापासून स्वागत करते. मंत्रीच म्हणतात तुम्हाला खोके पाहिजे का ? पन्नास खोक्याची चर्चा आज वाड्या वस्त्यावर होत आहे. बच्चू कडु ज्या पद्धतीने सांगत आहे, त्याचे मी स्वागत करते, असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या. Supriya Sule