ETV Bharat / state

शिरुरमध्ये ३ बोकडांचा बळी देऊन 'करणी'; निवडणूक संपल्यानंतर घडला प्रकार - अंधश्रद्धा निर्मूलन कायदा

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. त्यामुळे असले प्रकार करणाऱ्यांचे फोफावत चालले आहे.

शिरुरमध्ये ३ बकरांचा बळी देऊन 'करणी'
author img

By

Published : May 3, 2019, 2:52 PM IST

Updated : May 3, 2019, 5:23 PM IST

पुणे - शिरुर तालुक्यातील कवठेयमाई गावातील माळरानावर करणी, जादुटोणा आणि अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याठिकाणी ३ बोकडांचे शीर कापुन बळी देण्यात आला आहे. शिवाय त्याबाजुने लिंबांची माळ करून काळ्या कपड्यासह पुरुष व महिलांचे नवीन कपडे ठेवुन ही पुजा केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शिरुर तालुक्यातील कवठेयमाई येथे ३ बोकडांचा बळी देऊन हा प्रकार केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्या यांनी गावात येऊन याबद्दल सविस्तर माहिती देऊन ग्रामस्थांनी भिण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले.

शिरुरमध्ये ३ बकरांचा बळी देऊन 'करणी'

मागील ६ महिन्यापूर्वी शिरुर तालुक्यातील मलठण येथे असाच जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार घडला असताना आज पुन्हा अशी भयानक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही अशा अंधश्रद्धेच्या भयानक घटना घडतातच कशा असाही प्रश्न समोर येत आहे. मात्र, अशा भयानक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्याच्या विज्ञानयुगात आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे. तर, दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. त्यामुळे असले प्रकार करणाऱ्यांचे फोफावत चालले आहे.

समाजात गेल्या अनेक दिवसांपासुन साधु, देवऋृषी असे अनेकजण अघोरी विद्येची खिरापत देत गावोगावी फिरत आहेत. हे लोक नागरिकांमधील अज्ञान पाहुन पैशासाठी अंधश्रद्धा पसरवतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भितीच्या छायेखाली आपले जीवन जगत आहेत.

Intro:Anc__शिरुर तालुक्यातील कवठेयमाई गावातील माळारानावर करणी,जादुटोणा,आघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार घडला असुन तीन बक-यांची मुंडकी कापुन बळी दिला असुन त्याबाजुने लिंबांची माळ करुन काळ्या कपड्यासह पुरुष व महिलांचे नवीन कपडे ठेवुन हि पुजा केली असुन अशा आगोरी विद्येमुळे कवठेयमाई परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणूकांच्या काळात अनेक जण अशा आघोरी विद्येचे प्रकार केले जातात मात्र अशा घटना समोर येत नाही मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शिरुर तालुक्यात पुरुष व महिलांचा पोशाख नारळ लिंबु,काळी कपडे असं करुन तीन बक-यांचा बळी देऊन हि अज्ञात व्यक्तींनी हि अाघोरी विद्या केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे

Byte__नंदिनी जाधव __अनिस कार्याध्यक्ष.

मागील सहा महिन्यापुर्वी शिरुर तालुक्यातील मलठण येथे असाच जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार घडला असताना आज पुन्हा अशी भयानक घटना समोर आली आहे प्रत्येक्षात राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आस्थिस्वात असतानाही अशा अंधश्रद्धेच्या भयानक घटना घडतातच कशा असाही प्रश्न समोर येतोय..मात्र अशा भयानक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Byte__ नागरिक

जग चंद्रावर चाललंय..! अन देशाच्या नकाशावर असणा-या पुणे जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातय आणि प्रशासकीय यंत्रणा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आस्थिस्वात असतानाही डोळेझाक करत आहे त्यामुळे आघोरी विद्या करणाऱ्यांचे फेलावत चाललं आहे

समाजात गेल्या अनेक दिवसांपासुन साधु,देवऋृषी अनेक जण आघोरी विद्येची खिरापत देत गावोगावी फिरत असतात आणि माणसांमधील अज्ञान पाहुन पैशासाठी अंधश्रद्धा पसरवतात त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भितीच्या छायेखाली आपलं जीवन जगत आहेत.Body:स्पेशल पँकेज स्टोरीConclusion:
Last Updated : May 3, 2019, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.