पुणे : पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीनेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला ( Accused Suicide Attempt In Lockup ) आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची तरी सुरक्षा व्यवस्थित आहे का नाही हा प्रश्न निर्माण झाला (Question Mark On Pune Police Security ) आहे. त्या ठिकाणी पोलीस असतात, कर्मचारी असतात त्यानंतर सुद्धा आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
लोखंडी सळ्यावर डोके आपटून जखमी करण्याचा प्रयत्न : पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये लोकअपमध्ये असलेला आरोपी अमोल राजू शिरसागर हा वय वर्ष २५ आरोपी हडपसर पोलीस स्टेशनच्यामध्ये लॉकअपमध्ये असताना भिंतीवर, लोखंडी सळ्यावर स्वतःचे डोके आपटून जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या आरोपीपासून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा लघवीचा बहाना करून ससून हॉस्पिटलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न या आरोपीने केला आहे.
येरवडा तुरुंगात तुफान हाणामारी : काही दिवसापूर्वीच येरवडा तुरुंगात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली ( Fight In Yerawada Jail ) होती. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या बाबतीत काय होते. हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर आता हडपसर पोलीस स्टेशनच्या ( Hadapsar Police Station )लोकांमध्ये असलेल्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे अधिक तपास पोलीस करत आहे.