पुणे : सुमारे ४१ दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आज संध्याकाळी चंद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग झाले. इस्रोच्या चंद्रयानाने इतिहास रचला आहे. चंद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग झाले. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. चंद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर देशभर जल्लोषाचे वातावरण आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. पुण्यात देखील ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे जेआरव्हीजीटीआय आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, यांच्या वतीने चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वी उतरल्याबद्दल ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला आहे.
असा केला आंनद साजरा : जसे जसे अंतर आणि वेग कमी होत होता तस तसे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत होती. टेरर 17 चा थरार अनुभवला, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या गेल्या. जल्लोशपूर्ण वातावरण होते, तिरंगा डौलात फडकवत होते. चंद्रयान 3 ची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
आजपर्यंतची चंद्र मोहीम : चला मुलांनो आज पाहू या शाळा चांदोबा गुरुजींची, चंदाराणी, खोया खोया चांद, चंदारे चंदारे बैठेंगे बाते करेंगे, चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर, चलो दिलदार चलो, जिंगल बेल या गाण्यांच्या माध्यमातून चंद्राचा आजवरचा इतिहास उलगडून दाखवला. गॅलिलिओचा दुर्बिण शोध, केपलरचे नियम, चंद्रावर जाणारे अंतराळवीर आणि विविध देशांची याने, नील आर्मस्ट्राँग याचे चंद्रावरील पहिले पाऊल, त्यानंतरच्या चंद्रमोहिमा, त्यांच्या समोरील आव्हाने, भारताची चांद्रयान 1 पासून आजपर्यंतची चंद्र मोहीम याची माहिती दिली.
सर्व अंतराळयाने विषुववृताजवळ उतरली : दक्षिण गोलार्धात यान उतरवणे तांत्रिकदृष्ट्या अवघड आणि आव्हानात्मक असल्याचे महाजनी यांनी सांगितले. भारतात फक्त अंधश्रद्धा नाही तर विज्ञान आहे. पूर्णपणे आपल्या बळावर चंद्रयान उतरावले आहे याचा अभिमान असल्याचे महाजनी यांनी सांगितले. भारत दक्षिण गोलार्धात यान उतरवणार हा मान कोणाला मिळणार? लूना 25 मध्ये शेवटच्या क्षणी गडबड झाली, लूना 25 अपयशी ठरले असे महाजनी यांनी सांगितले. चंद्राची खगोलशास्त्रीय माहिती, चंद्राच्या कविता सादरीकरण, चांद्रयान 3 मोहीम माहिती, चांद्रयानाची प्रतिकृती, चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्याचे थेट प्रक्षेपण, शेवटी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा -
- चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींनी देशाचे अभिनंदन केले. 'आम्ही नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार आहोत. नवा इतिहास लिहिला गेला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते सध्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.
- Chandrayaan 3 Landing: भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा दिवस; चंद्रयान करणार चंद्रावर लँडिंग
- Chandrayaan 3 च्या लॅंडिंगसाठी अवघे काही तास बाकी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं