पिंपरी-चिंचवड (पुणे) - मावळमधील तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयातून कोरोनाबाधित महिलेने पलायन केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर महिलेला पकडण्यात पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. परंतु, या घटनेमुळे रुग्णालयातील अनागोंदी कारभार समोर आला आहे.
45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेवर तळेगाव मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून महिलेने पलायन केले. या घटनेनंतर सदर बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. महिलेचा तातडीने शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. या घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना देखील देण्यात आली. पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचारी महिलेचा शोध घेत असताना तळेगावमधील वतन नगर परिसरात महिला असल्याचे समजले. तातडीने त्या ठिकाणी जाऊन महिलेला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, महिलेच्या हातात लोखंडी सळई होती, ती विरोध करत असल्याने महिलेला पकडण्यास मोठी कसरत करावी लागली. अखेर, काही जणांनी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत पाठिमागून जाऊन पीपीई किट घातलेल्या काही कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित महिलेला पकडण्यात आले. हा सर्व थरार दीड तास सुरू होता. बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची धावपळ झाली.
पुण्यात कोरोनाबाधित महिलेचे रुग्णालयातून पलायन; दीड तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश - पुणे कोरोनाबाधित महिलेचे रुग्णालयातून पलायन बातमी
पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचारी महिलेचा शोध घेत असताना तळेगावमधील वतन नगर परिसरात महिला असल्याचे समजले. तातडीने त्या ठिकाणी जाऊन महिलेला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, महिलेच्या हातात लोखंडी सळई होती, ती विरोध करत असल्याने महिलेला पकडण्यास मोठी कसरत करावी लागली.