ETV Bharat / state

अकरावीची प्रवेश प्रकिया वादाच्या भोवऱ्यात? इंटर्नल मार्क ग्राह्य धरण्याची विद्यार्थ्यांची मागणी - पुणे

राज्य मंडळाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इंटर्नल मार्कही ग्राह्य धरावेत, अशी मागणी आता सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

अकरावीची प्रवेश प्रकिया वादाच्या भोवऱ्यात? इंटर्नल मार्क ग्राह्य धरण्याची विद्यार्थ्यांची मागणी
author img

By

Published : Jun 15, 2019, 5:30 PM IST

पुणे - राज्य मंडळाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इंटर्नल मार्कही ग्राह्य धरावेत, अशी मागणी आता सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदा मोठी घट झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेकडून दिले जाणारे 20 गुण यावर्षी देण्यात आले नाहीत, त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणात घट झाली आहे, तर सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना 20 गुण मिळाल्याने त्यांचे गुण वाढले आहेत.

अकरावीची प्रवेश प्रकिया वादाच्या भोवऱ्यात? इंटर्नल मार्क ग्राह्य धरण्याची विद्यार्थ्यांची मागणी

अशा परिस्थितीत अकरावी प्रवेश प्रक्रियेत आमच्यावर अन्याय होईल, अशी भूमिका घेत राज्य मंडळाच्या विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणमंत्र्याकडे 20 गुण ग्राह धरण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता ही प्रवेश प्रक्रिया घेताना लेखी परीक्षेचे 80 टक्के गुण ग्राह्य धरले जाण्याबाबत विचार सुरू असल्याने आता सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पालकांनीही एकत्र येत, असे न करण्याबाबत शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आयत्यावेळी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बदलण्याचा घाट घातला जात आहे. नवे सूत्र अन्यायकारक आहे, अशी भावना विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली आहे.

सीबीएसई आणि आयसीएसईचा अभ्यासक्रम कठीण आहे. काही शाळा विद्यार्थ्यांना जास्त गुण देतही असतील, पण राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल कमी लागला म्हणून अचानक प्रवेश प्रक्रियाच कशी काय बदलू शकते. या गुणांसाठी आम्ही मेहनत घेतली असून शाळेने सांगितलेल्या प्रकल्पांवर वेळ खर्च केला आहे. मिळालेले इंटर्नल गुण सहजा-सहजी मिळाले नाहीत, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे अकरावी प्रवेशाचा मुद्दा गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत, त्याबरोबरच अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा वादाच्या भोवर्यात अडकण्याची शक्यता असून शिक्षण मंत्र्यांकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Intro:mh pune 11th admission issue 2019 pkg 7201348Body:mh pune 11th admission issue 2019 pkg 7201348

anchor

राज्य मंडळाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इंटर्नल मार्क ही ग्राह्य धरावेत अशी मागणी आता सीबीएसई आणि आयसीएसई च्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केली आहे....राज्य मंडळाच्या  दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदा मोठी घट झाली आहे एकीकडे या विद्यार्थ्यांना शाळेकडून दिले जाणारे 20 गुण यावर्षी देण्यात आले नाहीत त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणात घट झाली तर सीबीएसई आणि आयसीएसई च्या विद्यार्थ्यांना इंटर्नल चे 20 गुण मिळाल्याने त्यांचे गुण वाढलेले आहेत अशा परिस्थितीत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेत आमच्यावर अन्याय होईल अशी भूमिका घेत शिक्षणमंत्र्याकडे आर्जव केले त्यामुळे आता ही प्रवेश प्रक्रिया घेताना लेखी परीक्षेचे 80 टक्के गुण ग्राह्य धरले जाण्याबाबत विचार सुरू असल्याने आता सीबीएसई आणि आयसीएसई च्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये खळबळ उडाली असून या पालकांनी एकत्र येत असे न करण्याबाबत शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची भूमिका घेतली आहे, आयत्यावेळी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बदलण्याचा घाट घातला जात आहे नवे सूत्र अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली.  सीबीएसई आणि आयसीएसईचा अभ्यासक्रम कठीण आहे. काही शाळा 

विद्यार्थ्यांना जास्त गुण देतही असतील, पण राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल कमी लागला म्हणून अचानक प्रवेश प्रक्रियाच कशी काय बदलू शकते मात्र आम्ही वर्षभर या गुणांसाठी मेहनत घेतली असून शाळेने सांगितलेले  प्रोजेक्ट्स वर वेळ खर्च केलाय जे इंटर्नल गुण मिळाले ते सहज मिळालेले नाही अशी या विद्यार्थ्यांची भावना आहे त्यामुळे आता हा मुद्दा गाजणार अशी चिन्ह आहेत त्यामुळे अकरावीची परीक्षा प्रक्रिया यावर्षी वादाच्या भोवर्यात अडकण्याची शक्यता असून शिक्षण मंत्र्यांकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आहे

byte पालक

Byte विद्यार्थीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.