ETV Bharat / state

पुणे : फुरसुंगी कॅनलमध्ये वाहत चाललेल्या महिलेचे तरुणाने वाचविले प्राण

कॅनलमध्ये एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून चालली होती. तिच्या मुली आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागत होत्या. परंतु, तिथे कोणीच मदत करायला तयार नव्हते. मात्र, नीरजने त्याच्या काही मित्रांसह त्या महिलेला पाण्याबाहेर काढले आणि रुग्णवाहिका बोलावून तिला रुग्णालयामध्ये नेण्याची व्यवस्था सुद्धा केली.

तरुणाने वाचविले प्राण
तरुणाने वाचविले प्राण
author img

By

Published : Sep 15, 2020, 6:28 PM IST

पुणे : कोरोनाच्या दहशतीमुळे रक्ताचे नातेदेखील अंतर राखत असल्याचे चित्र कोरोना काळात पुढे येऊ लागले आहे. अगदी नात्यातल्या व्यक्तीनेही जवळ न घेतल्याचा घटना राज्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. मात्र, पुण्यातील एक घटना याला अपवाद ठरला आहे. सायकलिंगसाठी निघालेल्या नीरज दीक्षित या तरुणाने कॅनलमध्ये वाहत असलेल्या एका महिलेचे प्राण वाचवून कोरोनाकाळातही माणुसकी जपली आहे.

कॅनलमध्ये वाहत चाललेल्या महिलेचे तरुणाने वाचविले प्राण

एखादी घटना घडत असताना तिथे बघ्यांची गर्दी जास्त असते. काहीजण आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात त्या घटनेचे चित्रीकरण करण्यातच रमतात. मात्र, एखादाच मदतीसाठी पुढे येतो. असाच मदतीचा हात पुण्यातील नारायणपेठ येथे राहणाऱ्या नीरज दीक्षित याने पुढे केला आहे. फुरसुंगी येथील कॅनलमध्ये वाहून जात असलेल्या एका महिलेचा जीव त्याने वाचवला आहे. नीरज हा आपल्या मित्रांबरोबर लोणी काळभोर येथे सायकलिंगला गेला होता. परत येताना फुरसुंगी येथील कॅनॉलजवळ गर्दी जमलेली त्याने व त्याच्या मित्रांनी पाहिली. त्या कॅनलमध्ये एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून चालली होती. तिच्या मुली आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागत होत्या. परंतु, तिथे कोणीच मदत करायला तयार नव्हते. मात्र, नीरजने त्याच्या काही मित्रांसह त्या महिलेला पाण्याबाहेर काढले आणि रुग्णवाहिका बोलावून तिला रुग्णालयामध्ये नेण्याची व्यवस्था सुद्धा केली.

कोरोनाच्या या काळात एखाद्या व्यक्तीला मदत करायचे म्हणजे माणूस दहा वेळा विचार करतो. अशी परिस्थिती असताना मदत करायची का नाही हा प्रश्न तर आहेच पण सोबतच त्याला काही झालंय तर नाही ना, अशी शंकादेखील मनात असते. तर, काहीजण आपण लांबच बरं, अशी भूमिका घेताना दिसतात. मात्र, आपल्या जीवाची पर्वा न करता नीरजने त्या महिलेला वाचवण्यासाठी कॅनलमध्ये उतरत तिचे प्राण वाचवले.

हेही वाचा - मराठा आरक्षण प्रकरण : पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय आमदार, खासदारांच्या घरासमोर आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.