पुणे: महाराष्ट्राचे लोक वैभव असणारी लावणी जरी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कितीही चांगल्या प्रकारे बघत असलो, तर समाजाचा दृष्टिकोन मात्र त्याकडे बघण्याचा हा तेवढा चांगला नाही. परंतु स्वतःच्या आवडीसाठी लावणी करणे, लावणीतून आई- वडिलांच्या आयुष्यासाठी अधिकारी होणे. असा थक्क प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील एक यशस्वी पोलीस अधिकारी म्हणून सुरेखा कोरडे यांचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी आहे.
आईसोबत कामाला जायाचे: सुरेखा कोरडे यांचे सुरुवातीचे शिक्षण हे औंधमधील कस्तुरबा गांधी वसाहत त्या ठिकाणी झालं.आई- वडिलांची परिस्थिती जेमतेम होते. वडील पीएमटी ड्रायव्हर होते. तर आई धुनी भांडे घासायची. 5 मुली असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती ही, तेवढी चांगली नव्हती. त्यावेळेस सुरेखा कोरडे यादेखील आईसोबत कामाला जायच्या, आपल्या वडिलांचे पहाटे उठून जाणे हे त्यांना सतत कुठेतरी मनाला दुःख देत होतं. आणि आपण यांना हातभार लावावा अशा विचारातूनच, त्याने लावणीकडे छंद आणि थोडेसे पैसे मिळतील. या दृष्टिकोनातून लावणी करायला सुरुवात केली.
आर्थिक परिस्थिती बेताची: दहावीत असताना कराटेच्या क्लासला काठमांडूला स्पर्धेला जायचं होतं. आणि त्यासाठीची जी फीस होती, ती 9 हजार रुपये होती. ती फीस भरण्यासाठी त्याने एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला पहिला नंबर आला. आणि त्या काठमांडूला सुद्धा गेल्या परंतु, तेवढे पैसे आई- वडिलांकडे नसल्यामुळे त्याने ते डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि तिथून खऱ्या अर्थाने हा लावणीचा प्रवास सुरू झाला.घरी 5 बहिणी, आई- वडील या सर्वांचे आर्थिक परिस्थिती बेताची, स्वतःला लावणी करण्याचा छंद असल्यामुळे त्याने लावण्यखणी कार्यक्रमांमध्ये लावणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु आई-वडील आणि समाज, हा नेहमीच या लोककलेकडे वाईट नजरेने बघतो. त्यामुळे वडिलांचा सुरुवातीला खूप विरोध होता. त्यानंतर घरूनच विरोध असल्यामुळे समाजातले लोक खूप काही बोलायचे. पण आवड म्हणून त्याने वडिलांना न सांगता अनेक कॉम्पिटिशन केले. त्यानंतर एक दिवशी वडिलांनी अट घातले की, तू जर शिक्षण घेत असेल, तर आम्ही तुला लावणी करायला देतो. लावणीच्या आवडीसाठी त्याने स्वतःच पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.
लावण्यखणी नावाचा लोकप्रिय: महाराष्ट्र मधील लावण्यखणी नावाचा लोकप्रिय लावणी प्रोग्राम होता. त्यामध्ये त्या आपली कला सादर करायचे. त्या कला सादर करतानाच दौऱ्यामध्ये त्या अभ्यास करायचा. आणि त्यांच्या लावणीचे जे प्रोडूसर होते. त्यांनी त्यांच्यासाठी अशी त्या गाडीमध्ये व्यवस्था केली, की या सर्वांना ज्यांना इच्छा आहे. त्यांना अभ्यास करता यावं. आणि त्यातून थोडसं प्रशिक्षण ही घेतलं. एमपीएससी या सगळ्यांचा प्रवास एका दिवशी ते एका कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर, त्यांचे दाजी चंदनशिवे त्यांनी सांगितले. आता तु बस कर हे, लावणी, नाचणे, तमाशा, एमपीएससी वगैरे कर आणि तिथून सुरू झाला, अधिकारी होण्याचा प्रवास असं त्या सांगतात.
2010 एमपीएससीच्या मुख्य परीक्षा पास: कलेचे क्षेत्र असा आहे की, प्रत्येक कलाकाराला या क्षेत्रामध्ये चांगले वाईट अनुभव येत असतात. आणि यातूनच हे मोठे कलाकार घडत असतात. परंतु काही ठिकाणी त्यांना थोडेसे वेगळे अनुभव आल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला. आपण हे किती दिवस करणार या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहेत. त्यामुळे एका मर्यादा पलीकडे आपण लावणी कलाकार असो किंवा नसो, परंतु जर आपण एमपीएससी केलं तर अधिकारी म्हणून मात्र शेवटपर्यंत असू. या उद्देशाने आणि आई- वडिलांच्या मान समाजामध्ये मिळावा, समाजाने त्यांना हिणवू नये, या उद्देशाने त्याने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली. 2010 एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी त्यांनी 2 महिने सदाशिव पेठमध्ये राहून अभ्यास केला. आणि त्यांची पहिली पोस्टिंग कळंबोली पोलीस स्टेशनला झाली. आज या गुन्हे अन्वेषण शाखेला एक यशस्वी अधिकारी म्हणून काम करता आहेत.
अधिकारी होण्याचा निर्णय: लावणीमध्ये चांगलं करिअर चालू असताना. त्यांना दोन पुरस्कार मिळाले गदिमा आणि दुसरा राजश्री शाहू पुरस्कार मिळाला. परंतु आपल्या आवडीपेक्षा आपल्या आई- वडिलांचा मानसन्मान जास्त महत्त्वाचा आहे. या हेतूने त्याने पोलीस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्या अधिकारी झाल्या, परंतु प्रत्येक कलाकाराचे दुःख आहे .तेच दुःख त्याही बोलून दाखवतात की, लावणी ला नाव ठेवणे समाजाने बंद केले पाहिजे. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि ज्या मुली जे कलाकार हे सगळं करून काही करण्याची इच्छा बाळगतात. त्याने सुद्धा लावणीचे महत्त्व टिकून ठेवावं.
आई वडील पाठीशी: आजच्या लावण्या होतात, त्यात त्या कलेचा विपर्यास केला जात आहे. आणि तो होऊ नये, अशी कलाकार म्हणून त्यांची मनापासून इच्छा आहे. लावणी आणि तमाशा हे दोन्ही लोक संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यांचे महत्त्वही आहे. पण जोपर्यंत समाज हे महत्व मान्य करत नाही. तोपर्यंत हे असे प्रसंग घडून काही कलाकारांना जीवनांना कलाटणी सुद्धा द्यावी लागते. परंतु लावणीमुळे मी सर्वस्व इथपर्यंत आले असेही त्याने मान्य केलेला आहे. आणि माझ्या आई वडिलाप्रमाणे प्रत्येकाची आई वडील पाठीशी असतात. त्यांचा मान राखा, त्यांच्या इच्छा पूर्ण करा, अगोदर आई-वडिलांना जपा. आणि आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही .त्यामुळे शिक्षण हाच आपल्यासाठी सर्वस्व पर्याय असल्याचं त्या नवीन येणाऱ्या मुलींसाठी सांगतात. त्याचबरोबर समाजाने माझ्यातली कला बघितली नाही, याचे दुःखही द्या व्यक्त करतात.
कर्तृत्व सिद्ध करावा लागतं: व्यक्तीच्या मनामध्ये जिद्द असेल आणि कर्तुत्वाने आपल्याला काही करण्याची आवड असेल, तर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपण बदलू शकतो. आणि समाज सुद्धा आपल्याला त्या सर्वोच्च स्थानी बघताना आदराने बोलतो. परंतु समाजासाठी आपण नेहमीच आपल्या कुठल्यातरी गोष्टीचा त्याग करून कर्तृत्व सिद्ध करावा लागतं, हे मात्र खरं आहे. नटसम्राटाच आयुष्य प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असेल, असे म्हणायचं नाही. परंतु नटसम्राटाच्या आयुष्यातला काहीतरी भाग प्रत्येक कलाकारांच्या जीवनाच्या अनुभवात येतो. त्यातूनच समाजाला सातत्याने जागृत करणे ही आज काळाची गरज आहे.