पुणे- शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मध्यंतरी पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झापट्याने वाढ होताना दिसत आहेत. या रुग्णांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रात्रीची संचारबंदी
राज्यात सगळीकडे पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे यावर आळा घालण्यासाठी प्रशानसनाने रात्री अकरा ते पहाटे पाचवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोनावर आळा घालण्यासाठी पुण्यातील शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररी पन्नास टक्के क्षमतेनूसार विद्यार्थांना वापरता येणार आहेत. तसेच शहरात हॉटेल १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आसनक्षमेच्या ५० टक्के लोकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तर होम डिलीव्हरी ११ वाजेपर्यंत करता येणार आहे. तर थिएटर, मॉल्स आणि दुकानांनाही रात्री दहावाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लग्न समारंभारत ५० टक्के लोकांनाच परवानगी
लग्न समारंभ, धार्मिक विधी, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी तसेच दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या व्यक्ती हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सौरभ राव म्हणाले