आंबेगाव (पुणे) - तालुक्यातील अवसरी खुर्द गावात चिमुकल्या मुलांसह वृद्धांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सात जणांना गंभीर इजा झाली असून सर्वांवर मंचर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देऊबाई शिंदे वय ७५,शिवनाथ शिंदे वय ५५,प्रकाश गुरव वय ६०,भिमाजी शिंदे वय ६५,आर्फिन अन्सारी वय ४,रजत कराळे वय ८ अशी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमींची नावे आहेत
अवसरी खुर्द येथील देऊबाई शिंदे या घरात बसल्या असता एका पाळीव कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यानंतर त्यांना घराबाहेर ओढत नेले. अवसरी खुर्द येथील देऊबाई शिंदे या घरात बसल्या असता एका पाळीव कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दरम्यान घराबाहेर दोन चिमुकली मुले खेळत होती, त्यांच्यावरही कुत्र्याने हल्ला केला. अशा एकूण दहा जणांवर कुत्र्याने हल्ला केला असून सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - सांगा गणपती विसर्जन करायचे कुठे? शिवसेनेचे पालिकेमध्ये आंदोलन
या हल्ल्यामुळे अवसरी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरु आहे. मात्र, अद्याप कुत्र्याचा कोणताही तपास लागलेला नसून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे भटक्या कुत्र्यांच्या अन्नपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ही भटकी कुत्री मांसाहाराच्या दुकानांकडे वळली आहे. मात्र, दुकानातील निकृष्ठ मांस खाल्याने कुत्री पिसाळली असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - बाप्पापुढे यंदा डिजिटल दानपेटी..! फोन पे, पेटीएमद्वारेही करता येणार दान