ETV Bharat / state

Supriya Sule On Urfi Javed : उर्फी जावेद, चित्रा वाघ यांच्या वादावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

अभिनेत्री ऊर्फी जावेद,( Actress Urfi Javed ) भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांच्या वादावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घाणेरड्या राजकारणासाठी महिलांवर बोलणे ( Supriya Sule reaction to the Urfi Javed controversy ) थांबवावे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना नम्र आवाहन आहे की, महिलांबद्दल कोणीही विनाकारण बोलू नये असे अवाहन त्यांनी केले.

Supriya Sule
Supriya Sule
author img

By

Published : Jan 4, 2023, 8:28 PM IST

उर्फी जावेद, चित्रा वाघ यांच्या वादावर सुप्रिया सुळे म्हणाल्या

पुणे - गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस फेम अभिनेत्री ऊर्फी जावेद,( Actress Urfi Javed ) भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांच्यात वाद सुरू असून दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की अशा वेळी कैलासवासी अरुण जेटली मला आठवतात. तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी महिलांवर बोलणे ( Supriya Sule reaction to the Urfi Javed controversy ) थांबवावे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना नम्र आवाहन आहे की, महिलांबद्दल कोणीही विनाकारण बोलू नये. मी हात जोडून सर्वांना विनंती करते की, महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. महिलाबद्दल कोणीही विनाकारण वाद करु नये.

महागाई, बेरोजगारीकडे लक्ष देण्याची गरज - या सर्वांचा विचार करता सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होते. तुम्ही स्वतःला आवरले पाहिजे. मुळात मला जनतेने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. महागाई, बेरोजगारी, वीजटंचाई ही महाराष्ट्रापुढील मोठी आव्हाने आहेत. याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्या.

जनजागर यात्राचे उद्घाटन - पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला एक जानेवारी २०२३ रोजी १७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने राज्यात जनजागर यात्रा सुरू करण्यात येत आहे. जनजागर यात्राचे उद्घाटन पक्षप्रमुख शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते.

सरकारने आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं - ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वीज कर्मचाऱ्यांच्या बैठकीनंतर केलेल्या विधानावर सुळे यांना विचारलं ते म्हणाल्या की, ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडले का? रोज टीव्हीवर कशाला यायला हवं असे सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात विरोधकांना त्रास देण्यासाठी हे सरकार सत्तेत आले आहे? की सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी? याचे देखील उत्तर फडणवीस यांनी द्यावा असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या.

प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य - चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर सुळे म्हणाल्या की, संविधानात मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमच्या सर्वांच्या चॅनेलवर चंद्रकांत पाटील जे बोलले ते दाखवा. मग पवार साहेब त्यावर नक्की प्रतिक्रिया देतील. तसेच अजित पवार यांनी आज मांडलेल्या भूमिकेबाबत देखील सुळे म्हणाले की, आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो अधिकार असल्यानं त्यात गैर काय? अस देखील यावेळी सुळे म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.