दौंड (पुणे) - येथील प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी भक्ती सेठ सुखेजा यांच्या हातातील पैशाची बॅग घेऊन सहा चोर पळून गेले होते. ( Money Stolen Daund ) दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तत्काळ सूत्रे हलवून बारा तासात आरोपींना अटक केले होती. या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम 9 लाख 82 हजार रुपये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आज (दि .21 फेब्रुवारी) रोजी मूळ मालक सुखेजा यांना दौंड पोलिसांनी सुपूर्द केली. ( Daund Police Station )
दौंड पोलिसांनी तत्काळ आरोपींना पकडले -
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी भक्ती सेठ सुखेजा यांच्या हातातील पैशाची बॅग घेऊन सहा चोर पळून गेले होते. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गंभीर गुन्हा घडल्याने पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तत्काळ सूत्रे हलवून बारा तासात आरोपींना अटक केली. आरोपींकडून 9 लाख 82 हजार रुपये जप्त करण्यात आले होते. या कामगिरीची दखल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी घेतली होती. दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व त्यांच्या टीमचा सत्कार केला होता.
सुखेजा यांना रक्कम परत केली -
या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आज भक्ती शेठ सुखेजा यांना परत देण्यात आली. याप्रसंगी दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे, सुशील लोंढे, शहाजी गोसावी, भगवान पालवे, सतीश राऊत, सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे, जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, सुनील सस्ते, सुभाष राऊत, सचिन बोराडे, अमोल गवळी, अमोल देवकाते, किरण डुके, आदेश राऊत, अभी गिरमे, रवी काळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.