ETV Bharat / state

लवकरच रेमडेसिविरचा साठा उपलब्ध होईल - जिल्हाधिकारी राजेश देशमुख - बारामती कोरोना घडामोडी

४२ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्ह्यातून मागणी आहे. त्यानुसार हे इंजेक्शन रास्त हॉस्पिटललाच देण्यात येणार असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मागील ३ दिवसात १२ हजार इंजेक्शन रास्त हॉस्पिटला दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

बारामती
author img

By

Published : Apr 16, 2021, 3:42 PM IST

बारामती (पुणे) - कोरोना संक्रमित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्याचे प्रमाण सध्या व्यस्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. सुमारे ४२ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्ह्यातून मागणी आहे. त्यानुसार हे इंजेक्शन रास्त हॉस्पिटललाच देण्यात येणार असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मागील ३ दिवसात १२ हजार इंजेक्शन रास्त हॉस्पिटला दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली. बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी देशमुख उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रेमडेसिविर औषधाच्या निर्यातीला केंद्र सरकारने बंदी घातली. त्यानुसार काही पुरवठादारांंकडून साडेतीन हजार इंजेक्शन विमानाने दिल्लीवरून मागवली व ही इंजेक्शने आवश्यक असणाऱ्या भागात वितरित करण्यात आली. इंजेक्शनचा जो साठा स्टॉकीसकडे येतोय तो साठा रुग्णालयांच्या मागणीनुसार व रुग्णांची संख्या विचारात घेऊन वितरित केले जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये महसूल व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

आवश्यक त्याच रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करावा...

ज्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता आहे. त्यांनाच इंजेक्शन देण्यात यावे. टास्कफोरने ज्या सूचना केलेल्या आहेत.त्या सूचनानुसारच सर्व डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करावा, असे आवाहन ही देशमुख यांनी यावेळी केले. रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या असून,पुढील काळात पुरेसा साठा उपलब्ध होईल असेेे ही देशमुख यांनी सांगितले.

सध्या ३२१ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी...

मागील पंधरा दिवसाला ७५ मेट्रिक टन ऑक्सीजन लागत होता. आज तेच प्रमाण ३२१ मेट्रिक टन वर गेले आहे. त्यामुळे शासनाने पुणे जिल्ह्यातील तीन ऑक्सीजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सूचना केल्या आहेत.की उत्पादित होणारा ऑक्सिजन केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठीच.राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.