ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - PMC news

पिंपरी-चिंचवडच्या देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम बापाने आपल्या 11 वर्षीय सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. तो मागील सहा महिन्यापासून पीडितेवर अत्याचार करत होता.

abused
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:03 AM IST

पुणे (पिंपरी-चिंचवड) - येथील देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 40 वर्षीय सावत्र बापानेच 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम हा पीडित मुलीची आई कामासाठी बाहेर गेल्यानंतर दरवाजाची कडी लावून मुलीवर लैंगिक अत्याचार करत असे. त्यानंतर याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही तो त्या मुलीला देत होता. पण, मागील 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या या अत्याचाराच्या वेदना तीला असह्य झाल्याने तीने दोन दिवसांपूर्वी आईला याबाबत सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने देहूरोड येथील शासकीय महिला डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नराधमाविरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नराधाम बाप हा यापूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीवरही लैंगिक अत्याचार केले होते. त्या गुन्ह्यात तो दोन वर्षांची शिक्षा भोगून आला होता. त्यानंतर काही वर्षांपासून तो पिंपरी-चिंचवडमध्ये राहत होता, अशी माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली आहे.

हेही वाचा - पिंपरी चिंचवड शहरात कोरोना 2 हजार पार; मंगळवारी 186 नवीन रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.