पुणे : ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. 11 सप्टेंबरपासून मुंबई येथील (ST Workers Strike) आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan) कर्मचारी उपोषण करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, घरभाडे, वार्षिक वेतन वाढ यासह फरक कर्मचाऱ्यांना मिळावा. त्यासोबतच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. या मुख्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उद्यापासून उपोषण करणार (Hunger Strike Of ST Employees) असल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनेने दिली आहे.
सोमवारपासून जाणार संपावर : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता. (ST Employees) कोरोना काळात राज्यातील सर्वश्रेष्ठ कर्मचारी सहा महिने संपावर गेले होते. या संपाला हिंसक वळणसुद्धा लागले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्नसुद्धा काही आंदोलकांनी केला होता. त्यामुळे ते आंदोलन खूप चिघळले होते. त्यानंतर कालांतराने एसटी सुरू झाली. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचारी संपावर जात असून, मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटना यांनी दिला आहे.
नागरिकांना बसणार आंदोलनाचा फटका : एसटी बंदचा सर्वात जास्त फटका हा ग्रामीण भागातील नागरिकांना बसतो. त्यामुळे आता जर कर्मचारी पुन्हा संपावर गेले तर पुन्हा नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. यावर सरकार किती गांभीर्याने विचार करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे, तर आता एसटी कर्मचारीही संपावर जाणार आहेत.
हेही वाचा -