पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या निकालावर नजर टाकली तर एकंदरीतच निकालाची टक्केवारी ही घसरलेली दिसून येते.
शाळावार निकालाची टक्केवारी बघितली तर राज्यातील ९ विभागात असलेल्या २२ हजार २४६ शाळांपैकी १७९४ शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. तर शून्य ते दहा टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या २०९ इतकी आहे. मंडळाच्या ९ विभागात ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ५१६ इतकी आहे.
निकालाच्या टक्केवारीनुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ विभागांमध्ये शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ही १७९४ इतकी आहे. विभागवार विचार केला तर पुणे विभागातल्या ३४९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर नागपूर विभागात १६७, औरंगाबाद विभागात १४३, मुंबई विभागात ३३१, कोल्हापूर विभागात ३०३, अमरावती विभागात १५६, नाशिक विभागात १७९, लातूर विभागात ७० तर कोकण विभागात ९६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शून्य ते दहा टक्के निकाल लागलेल्या शाळांची एकूण संख्या २०९ इतकी आहे. यात पुणे विभागातल्या ११, नागपूर विभागातल्या ४५, औरंगाबाद विभागातील ४२, मुंबई विभागातील ४१, कोल्हापूर विभागातल्या २, अमरावती विभागातल्या २८, नाशिक विभागातल्या १२, लातूर विभागातल्या २८ तर कोकणात शून्य शाळांचा निकाल हा शून्य ते दहा टक्के निकाल लागला आहे. या विभागात टक्केवारीचा विचार केला तर ९०% पेक्षा जास्त टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २८ हजार ५१६ इतकी आहे.
पुणे विभागात ५४३५ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागात १३८५ तर औरंगाबाद विभागात ३५०८, मुंबई विभागात ५३९९, कोल्हापूर विभागात ४२०७, अमरावती विभागात २७२५, लातूर विभागात २५९१, नाशिक विभागात २५०६ आणि कोकण विभागात ७६० विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.