पुणे : नेहमी म्हटले जाते की, पुण्यात जे पिकतं ते सगळीकडे विकले जातं. सध्या पुणे शहरात एका स्पेशल आईसस्क्रीमची ( Special ice cream )मोठी चर्चा असून ही आईसस्क्रीम खाण्यासाठी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसताना दिसत आहे. ही आईस्क्रीम म्हणजे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील आईस क्राफ्ट येथे मिळणारी वेगन आईसस्क्रीम ( Vegan ice cream in Pune ) होय.
वेगन आईसस्क्रीम पुण्यात प्रसिद्ध - अनेकदा आईसस्क्रीम म्हटले की आपल्याला फक्त ती दुधापासूनच बनते एवढेच माहीत असते. पण वेगन गाईचे किंवा कोणत्याही प्राण्याचे दूध न वापरता पदार्थ अनेकदा बनवले जातात. यामध्ये सोयाबीन पासून टोफू पनीर सारखे पदार्थ बनवले जाते तर दुधाच्यासाठी अजूनही आज पर्याय वेगवेगळ्या पदार्थ आहे. मग ते सोया मिल्क असो किंवा कोको मिल्क असतो या पदार्थांवर दुधाचे पदार्थ बनवणे शक्य होते. असेच हे वेगन आईस्क्रीम सध्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात प्रसिद्ध होत आहे. या वेगन आईस्क्रीमची क्रेझ सध्या पुण्यामध्ये वाढत आहे. आणि वेगन लोकांच्यासाठी पर्याय म्हणून हे आईस्क्रीम आवडीने खाल्ली जात आहे. 249 रुपयाला हे आईस्क्रीम मिळते. यामध्ये एकूण आइस्क्रीमचे पाच रोल असतात. एकूण या कॅफे मध्ये 13 प्रकारचे वेगन आईस्क्रीम मिळतात.
कॅफेत तेरा प्रकारच्या वेगेन आईस्क्रीम - माझ्या घरामध्ये माझा भाऊ वेगन झाला होता आणि त्यावेळेस मला प्रश्न पडला हा जर वेगन झाला तर आईसस्क्रीम कसा खाणार ? कारण की माझं कॅफे असल्यामुळे इथे आईसस्क्रीम सुप्रसिद्ध आहे. यावरती मी सर्च केले असता वेगन आईसस्क्रीम हा पर्याय मला सापडला. आणि याच्यावरती आम्ही काम करायला सुरवात केली. सध्या आमच्या कॅफेमध्ये तेरा प्रकारच्या वेगेन आईसस्क्रीम मिळतात. आणि या सर्व आईस्क्रीम आम्ही लोकांना लाईव्ह बनवून देतो. यामुळे या आईस्क्रीम अतिशय ताज्या असतात. आणि त्याची टेस्ट देखील आपल्या सर्वसाधारण आईसस्क्रीम सारखेच लागते, असे यावेळी मालक निखिल राठी यांनी सांगितले.
वेगन आईसस्क्रीम - आपल्या देशात प्रामुख्याने अनेक नागरिक वेगन जेवण फॉलो करतात . वेगन मध्ये फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा समावेश होतो. महत्त्वाची बाब अशी की वेगन डाएटमध्ये दूध, दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खात नाहीत. कारण म्हणजे गायीपासून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी तिला खाण्यासाठी, पिण्यासाठी जेवढं पाणी दिलं जात नाही त्यापेक्षा जास्त पाणी तिला खाण्यासाठी लागणारा चारा उगवण्यासाठी वापरण्यात येतं. त्यामुळे पर्यावरणाची हाणी होते. त्यामुळे दुधाचे पदार्थ खात नाहीत. सोबतच प्राण्यांपासून मिळणारं मांस, दूधापासून तयार करण्यात येणारा कोणताही पदार्थ खाण्यास मनाई आहे.अशातच आत्ता ही वेगन आईसस्क्रीम आल्याने वेगन फॉलो करणाऱ्यांसाठी एक आनंदाचीच बाब आहे,अस म्हणावे लागेल.