ETV Bharat / state

लहान मुलांचा कोरोना होऊ नये म्हणून घ्यावी 'ही' काळजी - पुणे जिल्हा बातमी

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होईल ,असे भाकितही वर्तविण्यात आले आहे. यामुळे लहान मुलांचा कोरोनापासून कसा बचाव कारावा, याबाबत बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय मानकर यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून माहिती दिली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 26, 2021, 3:36 PM IST

Updated : May 26, 2021, 4:21 PM IST

पुणे - भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पण, कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. या लाटेत लहान मुलांनाही धोका असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काय-काय उपाययोजना करता येऊ शकतात. पालकांनी काय दक्षता घ्यावी. यावर बालरोग तज्ज्ञ डॉ.संजय मानकर यांनी भाष्य केले आहे.

बातचित करताना प्रतिनिधी

तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका का..?

कोरोनाची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा त्याच सर्वाधिक प्रादुर्भाव हा ज्येष्ठांना होत होता. या लाटेत फक्त पाच टक्केच लहान मुलांमध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळाले. ते ही असे रुग्ण की ज्यांमध्ये लक्षणे नव्हती. तसेच दुसऱ्या लाटेत वयोमान हे 30 ते 50 झाले आणि या वयात जास्त प्रादुर्भाव पहायला मिळाले. म्हणून तज्ज्ञांच्या माहितीनुसार आता हे वय खाली-खाली होत असून आत्ता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका होण्याची भीती आहे. त्यातही 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण न झाल्याने याची भीती जास्त आहे.

लोकांनी घाबरू नये पण दक्षता घ्यावी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात असले तरी लोकांनी जास्त घाबरून जाऊ नये. दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याचे पाहायला मिळाले. पण, लहान मुलांमध्ये गंभीर होण्याचे प्रमाण हे खूप कमी होते. याचे मुख्य कारण म्हणजे लहान मुलांना जे बीसीजी, एमआर, एमएआर अशा लसी दिली जाते. त्यामुळे लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त वाढते आणि त्यांना लवकर संसर्ग होत नाही. तिसरी लाट आलीच तरी यात गंभीर होण्याचे प्रमाण हे कमी असू शकतात. त्यामुळे या नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर दक्षता घ्यावी, अे यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय मानकर यांनी सांगितले आहे.

पालकांची मुख्य जबाबदारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होऊ द्यायचे नसेल तर शासनापेक्षा जास्त जबाबदारी ही पालकांची असणार आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांना कोरोना कस होत यात काय-काय दक्षता घेऊ शकतो, यावर वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच गर्दीच्या ठिकाणी आपल्या घरातील लहान मुलांना घेऊन जाऊ नये. मास्क, सुरक्षित अंतर, तसेच वारंवार हात-पाय धुणे याचे महत्त्व मुलांना पटवून द्यावे लागणार आहे. तसेच पालकांनी लवकरात-लवकर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. कारण यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. दोन वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही. पण, त्यापुढील मुलांना मास्क कसे लावायचे हे शिकवले तर नक्कीच मुले याचे पालन करतील, असेही यावेळी मानकर यांनी सांगितले.

पालकांनी जास्तीत जास्त वेळ द्यावे

कोरोनाच्या या दीड वर्षांहून अधिक काळापासून सतत होणाऱ्या टाळेबंदी व कडक निर्बंधामुळे मुले घरीच आहेत. त्यात शाळाही बंद झाली आहे. ऑनलाइन शिक्षण आणि त्यानंतरही मोबाईलच होणाऱ्या जास्त वापरामुळे मुलांमधील स्क्रिन टाईम वाढले आहे. तसेच मुले घरात एकटे असल्याने त्यांना मानसिक ताण येण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे पालकांनी जास्तीत जास्त वेळ लहान मुलांसोबत घालवावा, त्यांच्याबरोबर विविध खेळ घरात खेळावे. यामुळे मुलांना मानसिक ताण होणार नाही, असा सल्ला मानकर यांनी दिला.

लहान मुलांच्या आहाराकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे

पालकांनी लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना मैद्याचे पदार्थ तसेच जंग फूड कमी द्यावे जेणेकरून या लहान मुलांना जास्त त्रास होणार नाही. ज्यातून प्रथिने मिळतील असेच अन्नपदार्थ मुलांना खायला द्यावे. तसेच कडधान्य व फळांचा आहारही द्यावा, असेही यावेळी डॉ. संजय मानकर यांनी सांगितले.

हेही वाचा - नृसिंह जयंतीनिमित्त चंदन उटीमधून माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारला नृसिंह अवतार

Last Updated : May 26, 2021, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.