पुणे: इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेसनंतर लवकरच मी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक देखील लॉन्च (I will be launching an electric tractor and truck) करणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी दिली आहे. वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. इथेनॉल आणि मिथेनॉल सारखे पर्यायी इंधन तसेच इलेक्ट्रिक हे भविष्य आहे. मला आठवतेय 3 वर्षांपूर्वी मी ई-वाहनांबद्दल बोलायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. पण आता बघा, ई-वाहनांना खूप मागणी आहे. लोक प्रतीक्षेत आहेत असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
-
After electric scooters - electric cars and electric buses...Soon I will be launching electric tractor and truck too: Union Minister Nitin Gadkari, in Pune, Maharashtra
— ANI (@ANI) June 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">After electric scooters - electric cars and electric buses...Soon I will be launching electric tractor and truck too: Union Minister Nitin Gadkari, in Pune, Maharashtra
— ANI (@ANI) June 4, 2022After electric scooters - electric cars and electric buses...Soon I will be launching electric tractor and truck too: Union Minister Nitin Gadkari, in Pune, Maharashtra
— ANI (@ANI) June 4, 2022
पुण्यात १००% इथेनॉलवर स्कूटर-ऑटो सुरू करण्यासाठी आम्ही बजाजशी बोलू इथून सुरुवात करूया. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल. बजाज टीव्हीएस आणि हिरोने फ्लेक्स इंजिन मोटरसायकल आणि ऑटो आणल्या होत्या. पुण्यात इंडियन ऑइलचे 3 इथेनॉल पंप मिळाले पण तेथे एक थेंबही विकले गेले नाही. त्यामुळे अजित पवारांनी एकत्र यावे आणि बजाजसोबत बैठक बोलावावी अशी मी विनंती करू इच्छितो अस्ही गडकरी यांनी म्हणले आहे.