पिंपरी- चिंचवड (पुणे) - ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे, त्या ठिकाणी सिग्नलचा टाइमिंग वाढवून वाहतूक कोंडी कमी केली जात आहे. याचा वाहतूक पोलिसांना मोठा फायदा होत आहे. सध्या स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आल्याची माहिती स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीमचे संस्थापक प्रदीप किलबिल यांनी दिली आहे.
वाकडच्या दत्त मंदिर चौकात ही सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे 60 ते 70 टक्के वाहतूक कोंडीत फरक पडल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील विविध चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाकड, पिंपळे सौदागर आणि हिंजवडी या ठिकाणी आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी राहतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या वेळेत वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिक व संगणक अभियंता यांना वाहतुकीचा मोठा फटका बसतो.
वाकडच्या दत्त मंदिराच्या चौकात बसविण्यात आलेली स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीममधील स्मार्ट सीसीटीव्ही वाहतूक कोंडीवरती लक्ष ठेवतात. अशाच पद्धतीची यंत्रणा शहरातील विविध चौकात बसविण्यात यावी, अशी अपेक्षा वाहतूक पोलीस व्यक्त करत आहेत. त्यामुळे भविष्यात पिंपरी- चिंचवड शहरात ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टीम दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
वाहतूक कोंडी झाल्यास सिग्नलचा कालावधी वाढवून वाहतूक कोंडी सुरळीत केली जाते. तसेच, ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी आहे, अशा ठिकाणी कालावधी कमी केला जातो. याचा फायदा वाहतूक सोडविण्यासाठी होतो-स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीमचे संस्थापक प्रदीप किलबिल
हे आहेत स्मार्ट सीसीटीव्हीचे फायदे
- नागरिकांना सिग्नलला जास्त वेळ थांबण्याची गरज पडत नाही.
- याचबरोबर व्हीआयपी मोमेंट्स व रुग्णवाहिकेसाठी ग्रीन सिग्नल दिला जातो. रुग्णवाहिकेतील रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहचू शकतो.
- तसेच व्हीआयपी मुव्हमेंट्समुळे अनेकदा नागरिकांना काही मिनिट थांबावे लागतं यातून देखील नागरिकांची सुटका होऊ शकते अशी माहिती स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीमचे संस्थापक प्रदीप किलबिल यांनी दिली आहे.
- यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा-
- Fine On Bageshwar Baba : बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबावर ठोठावला दंड, जाणून घ्या काय आहे कारण
- Amitabhs journey on a bike : ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अमिताभ यांनी चक्क बाईकवरुन गाठला स्टुडिओ
- Surgical Strike By Nagpur Traffic Police : बेशिस्त, मुजोर वाहनांचालकांवर नागपूर वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक