ETV Bharat / state

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे सहा जण ताब्यात, पुणे वनविभागाची मोठी कारवाई - पुणे शहर बातमी

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आलेल्या सहा जणांना वन विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून 3 किलो व्हेल माशाच्या उलटी सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 28 ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली.

v
v
author img

By

Published : Aug 28, 2021, 9:54 PM IST

पुणे - व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आलेल्या सहा जणांना वन विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून 3 किलो व्हेल माशाच्या उलटी सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 28 ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली.

मुहमदनईन मुटमतअली चौधरी (वय 58 वर्षे), योगेश्वर सुधाकर साखरे (वय 25 वर्षे), अनिल दिलीप कामठे (वय 45 वर्षे), ज्योतिबा गोविंद जाधव (वय 38 वर्षे), कृष्णात श्रीपती खोत (वय 59 वर्षे) आणि सुजाता तानाजी जाधव (वय 44) अशी रंगेहाथ पकडलेल्या सहा जणांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी तिघेजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला होता. त्यानुसार शनिवारी पिंपरी चिंचवड येथील पूर्णा नगर याठिकाणी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या वरील सर्व आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून साधारण तीन किलोग्राम व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ आणि चारचाकी गाडी जप्त केली.

ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल महेश मेरगेवाड, विजय शिंदे, वनरक्षक सुरेश बरले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, गणेश पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

टोल फ्री क्रमांकावर साधावा संपर्क

कोणत्याही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याची माहिती वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यात यावी तसेच हॅलो फॉरेस्ट या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा - जुन्नरमधील भर कार्यक्रमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार निघून गेले; पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.