राजगुरूनगर (पुणे) निमगावमध्ये चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव सहा दिवसांचा असतो. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता दही, दुध व तेलाने स्नान घालून खंडोबा व श्री म्हाळसादेवीला हळद लावण्यात आली. आज चंपाषष्ठीच्या दिवशी या उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
यळकोट येळकोट जय मल्हार म्हणत कुलदैवत खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला मंगळवारी दि. 15 डिसेंबरपासू सुरुवात झाली. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुलदैवत खंडोबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील निमगाव, खरपुडी, कडधे व धामणी येथे मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यामुळे यंदाचा सोहळ भक्तांविनाच पार पडला.
चंपाषष्ठीचे महत्त्व
चंपाषष्ठी हा दिवस कुलधर्म कुलाचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी मणिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, असे मानण्यात येते. त्यामुळे चंपाषष्ठीचा हा दिवस साजरा करण्यात येतो.