ETV Bharat / state

भाजप नगरसेविकेचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पुणे शहरातील भाजपच्या नगरसेविकेने चक्क शोले स्टाईल आंदोलन करत आपला निषेध नोंदवला आहे. सुजाता पालांडे असे नगरसेविकेचे नाव आहे.

भाजप नगरसेविकेचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन
author img

By

Published : Aug 13, 2019, 1:52 AM IST

पुणे - कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने भाजपच्या नगरसेविकेने येथे चक्क शोले स्टाईल आंदोलन करत आपला निषेध नोंदवला आहे. सुजाता पालांडे असे नगरसेविकेचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अशा वेळी एका भाजपच्याच नगरसेविकेला आंदोलन करण्याची वेळ आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

भाजप नगरसेविकेचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या प्रभाग क्रमांक २०, संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या परिसरात गेल्या सहा दिवसांपासून पाणी आलेले नाही तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंबंधित तक्रार नागरिकांनी त्यांच्याकडे केली होती. पालांडे यांनी जबाबदारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मात्र, यानंतरही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच काल सोमवारी पालांडे यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन तीन तास शोले स्टाईल आंदोलन केले आहे. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेविका पालांडे यांनी आंदोलन मागे घेतले.

Intro:mh_pun_01_shole_andolan_av_mhc10002Body:mh_pun_01_shole_andolan_av_mhc10002

Anchor:- प्रभागात पाणी कमी दाबाने येत असल्याने भाजपा नगरसेविकेवर शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सुजाता पालांडे असे या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेचे नाव आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्या प्रभागात कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार नागरिक त्यांच्याकडे केली होती. पालांडे यांनी जबाबदारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळेच आज सोमवारी पालांडे याना टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विशेष बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष्याची सत्ता आहे अश्या वेळी एका भाजपा नगरसेविकेला आंदोलन करण्याची वेळ आल्याने चर्चेला उधाण आले आहे. नगर सेविका सुजाता पालांडे यांच्या प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या परिसरात गेली सहा दिवस झाले पाणी येतच नाही, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित नगरसेविकेला नागरिकांनी केली होती. या प्रकरणी नगरसेविका सुजाता पालांडे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले मात्र त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे, सुचनांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे अखेर नेहरू नगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन तीन तास आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नगर सेविका सुजाता पालांडे यांनी आंदोलन मागे घेतले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.