ETV Bharat / state

युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ - shivsen and bjp alliance

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पुण्यामध्ये युतीचा पेच निर्माण झाला आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवाराने चक्क प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रचाराला सुरुवात केल्याने पुण्यातील राजकीय वातावरणात एकच चर्चा रंगली आहे.

युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ
author img

By

Published : Sep 17, 2019, 11:49 PM IST

पुणे - भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा मुद्दा तसेच युती होणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने आता शिवसेनेच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवाराने चक्क प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रचाराला सुरुवात केल्याने पुण्यातील राजकीय वातावरणात एकच चर्चा रंगली आहे.

हेहा वाचा - 'इलाका हमारा-धमाका हमारा'; पालघरमधील गुंडागर्दी मोडून काढू - आदित्य ठाकरे

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मंगळवारी पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडला. आजपासूनच (मंगळवारी) प्रचाराला सुरुवात करत आहोत असे जाहीर केले. या मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपचा उमेदवार आहे भाजपचे गिरीश बापट या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, ते खासदार झाल्याने आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे यावा अशी कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची भावना असल्याचे या नगरसेवकाने यावेळी सांगितले.

युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ

हेही वाचा - 'अजून म्हातारा झालो नाही, अनेकांना घरी बसवण्यासाठी बाहेर पडलोय'

२०१४ च्या निवडणुकीत ऐनवेळी युती फिस्कटली होती त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नव्हता. यावेळी मात्र युतीचे काय होईल ते वरिष्ठ नेते ठरवतील. मात्र, जर युती झाली नाही तर वेळेवर गडबड नको म्हणून आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली असल्याचे धनावडे यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कसबा गणपतीचे दर्शन घेतले प्रचाराचा नारळ फोडला आणि घरोघरी जाऊन प्रचार देखील सुरू केला युती झाली तर काय याबाबत बोलताना आतापर्यंत भाजपचा उमेदवार याठिकाणी होता. मात्र, आता कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला पाहिजेस, अशी आग्रही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आगामी काळात विधानसभा मतदारसंघावरून पुण्यात युतीमध्ये पीडा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा - 'तुमचे बापजादे गुरुकुलात शिकत होते, त्यावेळी आमचे बापजादे मैला उचलत होते'

Intro:युती च काय होईल ते होईल पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळBody:mh_pun_03_shivsena_nagarsevak_prachar_avb_7201348

Anchor
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा मुद्दा तसेच युती होणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नसताना आता शिवसेनेच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या नगरसेवकाने चक्क प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केल्याने पुण्यातील राजकीय वातावरणात एकच चर्चा रंगली आहे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मंगळवारी पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडला आणि आजपासूनच प्रचाराला सुरुवात करत आहोत असे जाहीर देखील करून टाकले या मतदारसंघात गेली पंचवीस वर्ष भाजप उमेदवार आहे भाजपचे गिरीश बापट या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते मात्र ते खासदार झाल्याने आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे यावा अशीच कार्यकर्त्यांची आणि त्या नागरिकांची भावना असल्याचं या नगरसेवकांनी यावेळी सांगितलं 2014 च्या निवडणुकीत ऐनवेळी युती फिस्कटली होती त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नव्हता यावेळी मात्र युतीचं काय होईल ते वरिष्ठ नेते ठरवतील जर युती झाली नाही तर वेळेवर गडबड नको म्हणून आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली असल्याचं धनावडे यांनी सांगितले त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कसबा गणपतीचे दर्शन घेतलं प्रचाराचा नारळ फोडला आणि घरोघरी जाऊन प्रचार देखील सुरू केला युती झाली तर काय याबाबत बोलताना आतापर्यंत भाजपचा उमेदवार याठिकाणी होता मात्र आता कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे झाला पाहिजे अशी आग्रही भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आगामी काळात विधानसभा मतदारसंघ वरून पुण्यात युतीमध्ये पीडा निर्माण होण्याची चिन्हे आहेत

Byte विशाल धनवडे, नगरसेवक शिवसेनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.