ETV Bharat / state

एक वृक्ष स्वराज्यासाठी..! शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन - raigad

पालखीने शिवनेरी किल्लावरुन पारंपरिक वाद्य आणि सनईच्या सुरात रायगडाकडे प्रस्थान केले आहे. शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

पालखी सोहळ्याचे आयोजन
author img

By

Published : May 27, 2019, 6:39 PM IST

पुणे - शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'एक वृक्ष स्वराज्यासाठी' या संकल्पनेतून शिवनेरी किल्ला ते रायगड किल्ला, अशा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज या पालखीने शिवनेरी किल्लावरुन पारंपरिक वाद्य आणि सनईच्या सुरात रायगडाकडे प्रस्थान केले. शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

शिवनेरी किल्यावरुन पालखी मार्गस्थ

शिवनेरी ते रायगड किल्ला असा २३५ किमीचा प्रवास ही पालखी करणार आहे. पालखी मार्गावर शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याशिवाय पालखीत सायकलस्वार सहभागी होणार आहेत. सायकलस्वारांच्या माध्यमातून 'प्रदूषणमुक्त भारत'चा संदेश देण्यात येणार आहे.

यंदा शिवराज्यभिषेकाचे ३४६ वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित हा पालखी सोहळा २७ मे ते ६ जून असा राहणार आहे. पालखी सोहळ्याचे हे ६ वे वर्ष असून पालखीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत.

Intro:Anc_शिवराज्यभिषेक दिनानिमित्त 'एक वृक्ष स्वराज्यासाठी' या संकल्पनेतून शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड असे पायी पालखीचे आज शिवनेरी वरून मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्य आणि सनई च्या सुरात रायगडकडे प्रस्थान झाले.यामध्ये तरुणाईचा मोठा सहभाग पहायला मिळाला असुन शिवधनुष्य प्रतिष्ठान हा उपक्रम हाती घेतला

किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड हा प्रवास 235 किलो मीटरच्या पालखी मार्गावर असणार आहे या पालखी सोहळा मार्गावर शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.या शिवाय या पालखीत सायकलस्वार सहभागी होणार असून ते प्रदूषणमुक्त भारत हा संदेश देनार आहेत.

यंदा शिवराज्यभिषेकाचे 346 वे वर्ष असून 27 मे ते 6 जूनदरम्यान या पालखीचे प्रस्थान होणार आहे.यंदा या पालखी सोहळ्याचे 6 वे वर्ष आहे असुन या पालखी सोहळ्यातुन सामाजिक संदेशही दिले जाणार आहेBody:..Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.