ETV Bharat / state

'मस्ती माझी नाही तर तुमची जिरली', आढळराव पाटलांचा अजित पवारांवर निशाणा

मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे  तोंड काळवंडले असुन, 'मस्ती माझी नाही तर मस्ती तुमची जिरली' असे म्हणत शिवाजी आढळराव पाटीलांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला.

आढळराव पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
author img

By

Published : Jul 20, 2019, 8:07 AM IST

पुणे - मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले असून 'मस्ती माझी नाही तर, मस्ती तुमची जिरली' असे म्हणत शिवाजी आढळराव पाटीलांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला. लोकसभेतील पराभवामुळे आढळराव पाटील यांची 'मस्ती जिरली' असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला आढळराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

आढळराव पाटील यांनी शिरुर येथे पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर टिका केली. स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही, म्हणून त्यांच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

आढळराव पाटलांचा अजित पवारांवर निशाणा

मुलाला मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आणता आले नाही, त्यांनी माझ्यावर टिका करणे हा विनोद आहे. लक्षात ठेवा 'माझ्या शिवसेना पक्षाचे राज्यात 18 खासदार आहेत. तुमच्या पक्षाचे फक्त 4 खासदार आहे'. माझा पराभव झाला मान्य आहे. परंतु, जे निवडून आले ते केवळ मालिकेमुळे निवडून आले आहेत. पराभवानंतरही पक्षाने माझा योग्य सन्मान केला असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

पार्थ जर पडला तर मी राजकारणातून निवृत्त होईन, असे वक्तव्य अजित पवारांनी निवडणुकीदरम्यान केले होते. या केवळ तोंडाच्या वाफा असून घरचा पक्ष फोडणारा हा माणूस असल्याची टिकाही आढळराव पाटलांनी केली. मी लोकांशी नम्र वागणारा माणूस असून आव्हानात्मक भाषा मी कधी केली नाही. अहंकाराने कधी वागलो नाही. माझ्या पक्षात माझा चांगला सन्मान असून माझ्या पराभवाची चिंता तुम्ही करु नये, असे म्हणत अजित पवारांना त्यांनी लक्ष्य केले.

Intro:Anc_स्वत:च्या मुलाला निवडुन नाही आणता आले आणि आपल्या मुलाचा झालेल्या पराभवाने तोंड काळवंडले असुन मस्ती माझी नाही तर मस्ती तुमची जिरली आहे.अजित पवारांना लक्ष करत असा घणाघात शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरुर येथे पञकार परिषदेत केला.

दोन दिवसांपुर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे आढळराव पाटील यांच्या पराभवामुळे आढळराव यांची मस्ती जिरली अशी टिका केली होती.यावर प्रत्युतर देत शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरुर येथे पञकार परिषदेत अजित पवार यांच्यावर घणाघाती टिका केली.

यावेळी आढळराव पाटील बोलताना म्हणाले कि,राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडुन माझ्यावर टिका केली.परंतु ज्यांच्या मुलाला मावळ लोकसभा मतदार संघातुन निवडुन आणता आलं नाही त्यांनी माझ्यावर टिका करणे हा विनोद आहे.हे लक्षात ठेवा "माझ्या शिवसेना पक्षाचे राज्यात 18 खासदार आहेत तुमच्या पक्षाच्या फक्त चार खासदार आहे".माझा पराभव झाला मान्य आहे परंतु जे निवडुन आले ते केवळ मालिकेमुळे निवडुन आले आहेत.पराभवानंतरही पक्षाने माझा योग्य सन्मान केला आहे हे लक्षात ठेवा असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

पार्थ जर पडला तर मी राजकारणातुन निवृत्त होइन असे  वक्तव्य अजित पवार यांनी निवडणुकिदरम्यान केले होते. ह्या केवळ तोंडाच्या वाफा असुन घरचा पक्ष फोडणारा हा माणुस असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.मी लोकांशी नम्र वागणारा माणुस असुन आव्हानात्मक भाषा मी कधी केली नाही.अहंकाराने कधी वागलो नाही.माझ्या पक्षात माझा चांगला सन्मान असुन माझ्या पराभवाची चिंता तुम्ही करु नये असे म्हणत अजित पवारांना लक्ष केले आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.