पुणे : वडील, मुलाचे नातं हे कुटुंबातला असतं. परंतु पक्षाचा विचार केला तर, ते नातं विचारधारेचा असतं उद्धव ठाकरे ने ही विचारधाराच ( Uddhav Thackeray does not understand Shiv Sena party ) सोडली. जे काही लोक त्यांच्यासोबत आहेत. ते वैयक्तिक प्रेमापोटी आहेत .त्यांचा आणि विचारधारेचे काहीही संबंध नाही. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री पदासाठी कधी हिंदुत्व सोडलं ( Hindutva ) नाही. त्यामुळे त्यानी पुन्हा एकदा विचारधारेसोबत यावं असा सल्ला शिक्षण मंत्री दीपक केसरकर ( Education Minister Deepak Kesarkar ) यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने ही ठाकरेंवर वेळ - उद्धव ठाकरे गटाने आज दिल्ली हायकोर्टामध्ये तीस वर्षे झालं मी पक्ष चालवतो मला माझ्या वडिलांचा नाव लावण्याचा अधिकार नाही. त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. त्यावर कोर्टाने लेखी उत्तर द्या असं म्हटलं आहे. त्यावरच दीपक केसरकर यांनी उत्तर दिलेले आहे. मुलगा आणि वडिलांचे नातं तोडता येत नाही ते कुटुंबाच असतं पण पक्षाचं नातं हे विचार झाले असते. बाळासाहेबांची हिंदुत्वचीविचारधारा होती. ज्या काळात हिंदुत्व हा शब्द उच्चारण सुद्धा अवघड होतं त्यावेळेस बाळासाहेबाने हिंदुत्ववादी भूमिका घेतली गर्व शिकवू हिंदू असं म्हटलं त्यामुळे बाळासाहेबांसोबत समाज जोडला गेला कार्यकर्ते जोडले गेले आणि पक्ष मोठा झाला त्यामुळे बाळासाहेबांनी कधी मुख्यमंत्री पदासाठी आपली विचारधारा सोडली नाही परंतु उद्धव ठाकरे ने विचारधारा सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले त्यामुळेच त्यांना ही वेळ आली. पुन्हा त्याने विचारधारेसोबत यावं असं मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसला उद्धव ठाकरे सोडायला तयार नाहीत - आम्हाला सांगितले जाते की आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व सोडलं परंतु आज सत्ता गेल्यानंतर सुद्धा ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे सोडायला तयार नाहीत त्यामुळे त्याने नेमकं कशावरून सोडलं हे आता समाजाने समजून घ्यायला पाहिजे जनतेला हे समजलं आहे त्यामुळे हे विचारधारांची लढाई आहे आणि ती विचारधारा आम्हाला समजली म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहोत. शिवसेनाही बाळासाहेबांचीच आहे असं ही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेना आणखी शिवसेना कळालीच नाही - मी शिवसेनेत उशिरा आलो पण मला शिवसेना समजली. ज्यांना शिवसेना आणि विचारधारा समजली नाही. त्यांच्या दुर्दैव आहे. आणि जे काही लोक आज उद्धव ठाकरे सोबत आहेत. ते वैयक्तिक प्रेमापोटी आहेत. विचारधारेची त्यांना काही देणंघेणं नाही उद्धव ठाकरेना आणखी शिवसेना कळालीच नाही. असेही यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालेवाडी भागामध्ये व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या कलादालनाचे लोकार्पण करण्यासाठी आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर आले होते. त्याने या कलादालनाच त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.