ETV Bharat / state

हाथरस प्रकरण: पुण्यात योगी सरकारविरोधात शिवसेनेचे आंदोलन, आरोपींना फाशीची मागणी

author img

By

Published : Oct 4, 2020, 4:20 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आले आहे. जेव्हा छत्रपतींचे आचरण दाखवण्याची वेळ योगी सरकारवर आली, तेव्हा त्या पीडितेच्या कुटुंबाला न्याय देता आले नाही. उलट त्या कुटुंबावर अजून अत्याचार करण्यात आले. याचा निषेध म्हणून आज शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली.

शिवसेना आंदोलन
शिवसेना आंदोलन

पुणे- हाथरस येथे मुलीवर अत्याचार करून तिला मारण्यात आले. कुटुंबाच्या परवानगीशिवाय रात्रीच्या वेळी पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या कुटुंबावर २० दिवस अत्याचार करण्यात आले. या घटनेचा निषेध आणि हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुण्यातील खंडोजी बाबा चौक येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हाव्ही. तो पर्यंत आरोपींना तुरुंगातच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

माहिती देताना शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आले आहे. जेव्हा छत्रपतींचे आचरण दाखवण्याची वेळ योगी सरकारवर आली, तेव्हा त्या पीडितेच्या कुटुंबाला न्याय देता आला नाही. उलट कुटुंबावर अजून अत्याचार करण्यात आले. याचा निषेध म्हणून आज शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली. मोदी सरकार हे बेटी बचाव नाही, तर बेटी जलाओचा नारा देत आहे. अशी टिकाही शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी योगी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा- लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.