ETV Bharat / state

एकाच गुन्ह्याच्या दोन एफआयआर; पोलिसांच्या अजब कारभाराने उडाली खळबळ

शिरूर पोलिसांनी एकाच गुन्ह्याच्या दोन एफआयआर दाखल केल्या आहेत, त्यामुळे पोलिसांच्या या अजब कारभाराने खळबळ उडाली आहे.

शिरूर पोलीस, पुणे
शिरूर पोलीस, पुणे
author img

By

Published : Jun 21, 2021, 1:54 PM IST

शिरूर (पुणे) - जिल्ह्यातील शिरुर पोलीस स्थानकात एका महिलेने सासरच्यांनी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पती विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच, त्याच पिडीत महिलेने पुन्हा दिलेल्या तक्रारीवरून त्याच आरोपी विरोधात पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गून्हा दाखल करण्यात आला. एकाच व्यक्ति विरोधात, तोच गुन्हा परत दाखल केल्यामुळे शिरूर पोलिसांच्या या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुढील सुनावणी 21 सप्टेंबर 2021 रोजी

9 डिसेंबर 2019 रोजी शिरूर पोलीस ठाण्यात एका महिलेनी तिची सासू व पती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून 0837/2019 क्रमांकाचा सीआर नंबर दाखल करण्यात आला होता. यावेळी महिलेला तिच्या मुलीसोबत घरातून हाकलून दिल्यानंतर पती, सासू विरोधात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण व धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा खटला सध्या शिरूर पोलीस ठाण्यात प्रलंबीत असून यामध्ये आतापर्यंत 9 जुलै 2020, 15 डिसेंबर 2020 आणि 22 एप्रिल 2021 ला सुनावणी झाली आहे. तर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.

पोलिसांचा अजब कारभार

पतीने दुसरे लग्न केल्याची व तिचा छळ झाल्याची तक्रार घेऊन संबधीत फिर्यादी महिला शिरूर पोलीस ठाण्यात 9 जून रोजी गेली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही पूर्व माहिती न घेता महिलेने दिलेल्या तक्रारीवरून त्याच संशयीत आरोपी विरोधात कौटुंबिक हिंसाचार व धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एकाच गुन्ह्याच्या दोन एफआयआर दाखल केल्यामुळे, पोलिसांच्या अजब कारभाराने खळबळ उडाली आहे.

'यापूर्वीच्या गुन्हात हा गुन्हा समाविष्ठ करण्यात येईल'

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे म्हणाले की, 'पीडित व्यक्ति तक्रार घेऊन आल्यानंतर तिची बाजू ऐकून घेणे आमचे काम असते. त्यानुसार तिची बाजू ऐकून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेला हा गुन्हा गैरसमजातून दाखल झाला आहे. यापूर्वी दाखल झालेल्या गुन्हात हा गुन्हा समाविष्ठ करण्यात येईल'.

हेही वाचा - स्वतःला समाजसेवक म्हणणाऱ्याच्या घरात निघाला हातभट्टी दारूचा अड्डा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.