ETV Bharat / state

Shirur Drugs Case : शिरुर तालुका बनलाय ड्रग्जचा अड्डा? फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; 174 किलो ड्रग्ज जप्त - ड्रग्जचा संबंध ललित पाटलांशी

Shirur Drugs Case : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नार्कोटिक्स विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका कंपनीमध्ये फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पुणे पोलीस नार्कोटिक्स विभागाकडून ही कंपनी सील करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलीये.

Shirur Drugs Case
शिरुर तालुका बनलाय 'ड्रग्ज'चा अड्डा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 3:44 PM IST

शिरूर/पुणे Shirur Drugs Case : सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरणं चांगलंच गाजतंय. या प्रकरणासंबंधित मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचं बोललं जात असताना आता शिरुर तालुक्यातील छोट्याशा मिडगुलवाडी गावात नार्कोटिक्स विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत तब्बल १७४ किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. दरम्यान, नार्कोटिक्स विभागाने ही कंपनी सील केली असून या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.



१७४ किलो ड्रग्ज जप्त : मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं शिक्रापूर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. ही कारवाई इतकी गोपनीय होती की यावेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तीस तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू होती. या कारवाईनं पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आलंय. तसंच या पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसण्याचं फिनेल हे केमिकल बनवलं जात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. शेड व कंपनी अतिशय जंगलात असल्यानं कोणालाही याची माहिती नव्हती. नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं केलेल्या या कारवाईत १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय.

ड्रग्जचा संबंध ललित पाटलांशी : या कारवाईनंतर आता शिरूर तालुका हा ड्रग्जच्या लिस्टमध्ये सामील झालाय. हा अड्डा कारवाईच्या रडारवर आल्यानं अमली पदार्थांची पाळेमुळे खोलवर रूजल्याचं दिसून येतंय. पुणे जिल्ह्यात सध्या ललित पाटील प्रकरण चांगलंच तापलं असताना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव व मिडगुलवाडी या दोन्ही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त केला गेल्यानं या घटनेशी ललित पाटीलचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.

हेही वाचा -

  1. Nashik Drug Racket : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नाशिकमधील फॅक्टरीतून ३०० कोटींचं ड्रग्ज जप्त
  2. Drugs Factory Destroyed : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाचा ड्रग्ज कारखाना उध्वस्त; १३५ किलो एम डी ड्रग्ज जप्त
  3. Drugs : घर का भेदी लंका ढाए, कारागृहातील सुभेदाराकडेच सापडला अडीच किलो गांजा

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.