ETV Bharat / state

Pandharpur Palkhi Sohala : यंदा पालखी सोहळ्यात दर तीन किमीला निवारा केंद्र; महिलांसाठी हिरकणी केंद्र - पंढरपूर पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये या वर्षी तीन ते चार किलोमीटर अंतरावर निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. वाढता उन्हाळा पाहता वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होणार नाही, याकडे पुणे जिल्हा प्रशासनातर्फे लक्ष दिले जाणार आहे. विसाव्याच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय उपचार केंद्र आणि महिलांसाठी हिरकणी कक्षसुद्धा उभारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली.

Pandharpur Palkhi Ceremony
पंढरपूर यात्रा
author img

By

Published : Jun 4, 2023, 4:00 PM IST

वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधेबाबत माहिती देताना अधिकारी

पुणे: पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज (रविवारी) जिल्ह्यातील पालखी विसावा आणि मुक्कामाच्या स्थळांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला आहे.

भाविकांच्या सुविधांची पाहणी: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहेत. यावर्षी असलेली उन्हाची तीव्रता पाहता त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेकडून तयारीची पाहणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात नीरा येथे पालखीचा मुक्काम असतो. तेथेसुद्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी एक इमारत घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा देण्यात आलेल्या आहेत.

निवारा केंद्राची उभारणी: पालखीचे टप्पे हे ठरलेले असतात. परंतु, यावर्षी पालखी मार्गात लागणारे ऊन लक्षात घेता, तीन ते चार किलोमीटरवर निवारा केंद्र उभारण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले आहे. त्याची तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे. त्याचाच आढावा जिल्हा परिषदेचे अधिकारी घेत आहेत. जिथे जिथे पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणच्या तयारीची पाहणी केली जात आहे.

पुणे जि.प.ची तत्परता: 11 जूनला पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर साधारण दोन दिवसांमध्ये पालखी पुण्यात मुक्कामाला येते. जिल्ह्यात पालखीचा पाच ते सहा दिवस मुक्काम असतो. त्यावेळी वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून सर्व उपायोजना करण्याचे काम चालू आहे.

सावली देणारे वृक्ष तोडले: यावर्षी पालखी मार्ग झाल्याने रस्त्याच्या आजूबाजूचे झाडे तोडण्यात आली आहेत. याच मार्गाने पूर्वी दिंड्या जायच्या आणि वारकरी या झाडाच्या आडोशाला विसावा घ्यायचे; परंतु आता पालखी मार्ग सहा पदरी झाल्याने या मार्गावर झाडेच राहिलेली नाहीत. त्यामुळे आता दोन-तीन किलोमीटरवर भाविकांनी विसावा घ्यावा यासाठी प्रशासनसुद्धा काम करत आहे.

हेही वाचा:

  1. Bajaj Finserv project : बजाज फिनसर्व्हची पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक, राज्यात निर्माण होणार 40 हजार रोजगार-उपमुख्यमंत्री
  2. odisha train accident : रेल्वे अपघाताचे कारण समजले..केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 'त्या' यंत्रणेवर ठेवला ठपका
  3. Odisha Road Accident: ओडिशातील रेल्वे अपघाताचे नेमके कारण काय?, रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.