पुणे Shital Mahajan : पद्मश्री शीतल महाजन (राणे) यांनी यापूर्वीही विश्वविक्रम केले आहेत. त्यांनी नव्या विक्रमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, माऊंट एव्हरेस्टसमाेर पॅराशूट जंप करण्याचं स्वप्न मी सन 2007 मध्ये प्रथम पाहिले. ते प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आहे. दरम्यान, सोमवारी (13 नोव्हेंबर) दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास त्यांनी हा नवा विश्वविक्रम रचलायं.
माऊंट एव्हरेस्ट समाेर 23 हजार फूट उंचीवरुन एएस 350 बी-3 या हेलिकाॅप्टर मधून उडी मारल्यावर 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडण्यात आलं. माऊंट एव्हरेस्ट सर करताना तीन महत्वाचे टप्पे समजले जातात. स्यंगबाेचे (12,402 फूट), अमादाबलम बेस कॅम्प (15,000 फूट) व कालापत्थर (17,500 फूट) याठिकाणी मुख्य माऊंट एव्हरेस्ट जम्प करण्यापूर्वी तीन पॅराशूट जम्प करण्यात आल्या आहेत. याकरिता या उंचीवर 260 ते 400 चाैरस फुटाच्या माेठ्या आकाराच्या पॅराशूटचा वापर करण्यात आला.
स्कायडायव्हिंगसाठी तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक : शीतल महाजन यांनी म्हटले की, बर्फाच्छादित हिमालयातील हवामानाचम स्वरुप गतिमान व सतत बदलणारं असतं. आतापर्यंतच्या प्रत्येक एव्हरेस्ट माेहिमेची याेजना अत्यंत अनुकूल हवामानाच्या अनुषंगानं आखण्यात आली. तरी ऐनवेळी हवामानात बदलत हाेतात ते मला अनुभवयास आलं. या अतिउंचीवरील स्कायडायव्हिंगसाठी तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. त्यादृष्टीनं पाॅल हेन्री डी बेरे, ओमाल अलहेगेलन, वेंडी स्मिथ, नादिया साेलाेव्येवा यांची साथ लाभली. एक्सप्लाेर हिमालय या स्कायडायव्हिंगचे संस्थापक सुमन पांडे यांनी नेपाळमध्ये सहकार्य केले. आतापर्यंत काेणत्याही भारतीय महिला स्कायडायव्हरनं माऊंट एव्हरेस्ट परिसरात स्कायडायव्हिंग केली नव्हती. हा विक्रम करण्याची संधी मला यारुपानं मिळाली.
वडीलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद : रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी, अनंत अंबानी यांनी आर्थिक पाठबळ दिलं. तर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अशाेक जैन, एराे इंडिया क्लब इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी, खासदार प्रशांत बाघ यांनी सहकार्य केले. तर पंतप्रधान नरेंद्र माेदी व केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्याेतिरादित्य सिंधीया यांनी प्राेत्साहित केलं. त्याचसाेबत माझी आई ममता महाजन, भाऊ हर्षल महाजन, पती वैभव राणे व मुले वैभव व वृषभ राणे यांनी घरातून पाठबळ दिल्याने आजचा विक्रम प्रस्थापित करु शकले आहे. त्याचप्रमाणे माझे दिवंगत वडील कमलाकर महाजन यांनी मला माऊंट एव्हरेस्ट माेहिमेसाठी सातत्यानं प्राेत्साहित केलं हाेतं. त्यांचे स्वप्न पूर्ण करु शकल्याचा आनंद आहे.
हेही वाचा -