आंबेगाव (पुणे) - राज्यभरात भाजपचे दूध दरवाढीबाबत आंदोलन सुरू आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पराग दुग्ध उद्योग समूहास भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी जागतिक पातळीवरील यंत्रणा अंमलात आणण्यासाठी बैठक घेतली. यावेळी उत्पादनशील व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील पराग दुग्ध उद्योग समूहाचे चेअरमन देवेंद्र शहा व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
दूध उत्पादन व दुग्ध व्यवसाय वाढीसाठी पुढील काळात काम करण्याची गरज असल्याने आज मंचर येथील पराग दुग्ध उद्योग समूहाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध व्यवसाय व दुधापासून उत्पादित होणारे उत्पादने वाढविण्यासाठी राज्यभरात उद्योग समूह उभे राहण्यासाठी पुढील काळात गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. आज पराग दुग्ध उद्योग समूहाला भेट दिली. पराग दुग्ध उद्योग समूहात कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानातून विकसित झालेली यंत्रणा उभारली आहे. या दुग्ध उद्योग समूहाच्या धर्तीवर राज्यात विविध उद्योग उभे राहून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मदत होणार असल्याचा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
स्वतःचे दूध विकायचे आणि शेजारचे दूध रस्त्यावर ओतायचे, अशी आंदोलने योग्य नाहीत. महात्मा गांधीजींनी आपल्या देशाला आंदोलनाची एक दिशा दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी व दुग्ध व्यवसाय संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुधाची नासाडी करून आंदोलन करू नये, असे आव्हान पराग दुग्ध उद्योग समूहाचे चेअरमन देवेंद्र शहा यांनी केले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराग दुग्ध उद्योग समूहात भेट देऊन दुग्धोत्पादन व दुग्धव्यवसाय वाढीसाठी काय उपाय योजना करण्यात येतील, याबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली. त्यावेळी देवेंद्र शहा माध्यमांशी बोलत होते.
मागील चार महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट जगावर आहे. त्यामुळे जगभरात लॉकडाऊनचे संकट असल्याने जागतिक बाजारपेठेत दूध व दुधापासून उत्पादित केलेली उत्पादने विक्री होत नाही. त्यामुळे छोटे-मोठे दूध व्यवसाय अडचणींचा सामना करत आहेत. मात्र, पुढील एक-दीड महिन्यात लॉकडाऊन संपल्यानंतर जगभरातील बाजारपेठ खुली झाल्यावर दूध व दुधाचे पासून उत्पादित होणारे उत्पादने विक्री होईल आणि पर्यायाने दुधाचे दर स्थिर होतील, असा विश्वास पराग दुग्ध उद्योग समूहाचे चेअरमन देवेंद्र शहा यांनी व्यक्त केला.
राज्यातील दुधाचे दर स्थिर करण्यासाठी दुग्ध उद्योग समूह प्रयत्नात आहे पुढील काळात ही परिस्थिती लवकरच स्थिर होऊन शेतकरी व दुग्धव्यवसाय यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात येऊन दुधाचे नुकसान करू नये, असे आवाहन देवेंद्र शहा यांनी केले.
नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील - शरद पवार - milk agitation in maharashtra
स्वतःचे दूध विकायचे आणि शेजारचे दूध रस्त्यावर ओतायचे, अशी आंदोलने योग्य नाहीत. महात्मा गांधीजींनी आपल्या देशाला आंदोलनाची एक दिशा दिली आहे. राज्यभरात भाजपचे दूध दरवाढीबाबत आंदोलन सुरू आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पराग दुग्ध उद्योग समूहास भेट देऊन बैठक घेतली.