पुणे - भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी वेळोवेळी आपली व्यूहरचना यशस्वी करून, भाजप व्यतिरिक्त सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली राजकीय कारकिर्द पणाला लावली होती. त्याप्रमाणे त्यांना 'महाविकासआघाडी' या नव्या आघाडीचे सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. या निर्णयाचे बारामतीकरांनीही स्वागत केले आहे.
हेही वाचा - केवळ फडणवीसच नाहीत, तर 'हे' आहेत देशभरातील 'औटघटके'चे ठरलेले मुख्यमंत्री
महिनाभर राज्यात सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. मतदारांनी दिलेल्या मताला कवडीमोल ठरवत मताची हेळसांड केली जात होती. मतदार राजा म्हणवणारी जनता हे सर्व हतबलतेने पाहत होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला महाराष्ट्रातील जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला होता. मात्र, राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. तसेच अजित पवारांनी घेतलेल्या यू-टर्नमुळे या राजकीय नाटकाला आणखीणच रंगत आली होती.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी चंग बांधला. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत पवारांनी 54 जागा निवडून आणल्या. भर पावसात सभा घेऊन भाजप विरोधी वातावरण निमिर्ती केली. मात्र, आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्याचवेळी मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत बिनसले आणि युती तुटली पवारांनी सेनेशी जुळते घेऊन शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आज यशस्वी होताना दिसून येत आहे.
कालच्या संविधान दिनाच्या निमित्ताने फसवं सरकार उलथवून टाकत नवं सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला. तो लोकशाही साजेल असाच आहे. पवार साहेंबांसारख्या ८० वर्षांच्या तरुणाने ८० तासात हे सरकार पाडले. तसेच पवार साहेबांच्या या निर्णयातून कोणताही बाका प्रसंग आला तरी, संयम सोडू नये हे आजच्या तरुणांनी घेण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया प्रविण घोळवे या बारामतीच्या नागरिकाने दिली.
हेही वाचा - 'वुई लव्ह यु अजित दादा' ! महाविकास आघाडीच्या बैठकीआधी समर्थकांची बॅनरबाजी