ETV Bharat / state

Sharad Pawar in Engineer Day Programme : मी जेव्हा संरक्षण मंत्री होतो तेव्हा...; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा - आमदार रोहित पवार

Sharad Pawar in Engineer Day Programme : पुण्यातील सिम्बोयासिस महाविद्यालयात राष्ट्रीय अभियंता दिनाच्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या संरक्षण मंत्री काळातील एक किस्सा सांगितलाय. मी संरक्षण मंत्री झालो तेव्हा मला आर्मीचा ड्रेस देखील माहीत नव्हता, तेव्हा मी कोल्हापुरातील जनरल थोरात यांच्याकडे जाऊन विद्यार्थ्याप्रमाणे याबाबत शिकल्याचं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar in Engineer Day Programme
Sharad Pawar in Engineer Day Programme
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 10:09 PM IST

शरद पवारांची शिक्षणाची पद्धत

पुणे Sharad Pawar in Engineer Day Programme : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असून त्यांनी अनेक खात्यांमध्ये कामही केलंय. त्यांनी त्यांच्या आयुष्याबाबत एक किस्सा सांगितला. जेव्हा मी संरक्षण मंत्री झालो तेव्हा मला आर्मीा ड्रेस देखील माहीत नव्हता, तसंच आर्मीमध्ये मेजर म्हणतात की लेफ्टनंट जनरल म्हणतात याबाबतही मला माहिती नव्हती. पण जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा मी एका विद्यार्थ्याप्रमाणे कोल्हापुरातील जनरल थोरात यांच्याकडे जाऊन शिकलो, असं सांगत पवारांनी त्यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या काळातील आपला किस्सा सांगितला. पुण्यातील सिम्बोयासिस महाविद्यालयात राष्ट्रीय अभियंता दिनाच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी हा किस्सा सांगितलाय. या कार्यक्रमासाठी शरद पवारांसह जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे तसंच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मला माणसं जोडायची सवय : यावेळी पवार म्हणाले की, मला माणसं जोडायची सवय आहे. मी लोकांशी बोलत असतो. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला जमत नाही त्या क्षेत्रामध्ये आपण विद्यार्थी म्हणून जावं असं माझं मत आहे. मी मुख्यमंत्री, कृषीमंत्री तसंच सरंक्षण मंत्री असताना देखील असंच करत होतो. आपल्याला एखाद्या क्षेत्राचा अभ्यास कमी आहे, म्हणून कमीपणा समजायचं नाही तर ते शिकण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असंही पवार म्हणाले. जेव्हा मला संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली, तेव्हा मला आर्मीबाबत काहीही माहिती नव्हती. तेव्हा मी कोल्हापुरातील जनरल थोरात त्यांच्याकडं जात होतो. संरक्षण मंत्री असूनही मी त्यांच्याकडे एका विद्यार्थ्याप्रमाणे सगळ्या गोष्टी शिकत होतो, असंही पवार यावेळी म्हणाले.

काय म्हणाले रोहित पवार : यावेळी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, सध्या सर्वात मोठा हातभार अभियंत्यांचा आहे. या देशाच्या आतापर्यंतच्या जडणघडनीत अभियंत्यांचं मोठं योगदान आहे. भविष्यातही आपली मोठी गरज भासेल याची मला जाणीव असल्याचं यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले. यानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, मी व्यवसाय क्षेत्रात फार लवकर कामाला लागलो. त्यामुळं मला पोस्ट ग्रॅज्युएशन करता आलं नाही. पण मी जेव्हा कंपनीत काम करत होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी एका शुगर फॅक्टरीचं काम सुरू केलं होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिथं असणाऱ्या अनेक इंजिनिअर्ससोबत मी चर्चा केल्याचंही रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar On INDIA Bharat Contravesry: गेटवे ऑफ इंडियाला काय म्हणायचं- शरद पवारांचा थेट मोदींना प्रश्न
  2. India Coordination Committee Meeting : 'इंडिया' समन्वय समितीची आज दिल्लीत बैठक; शरद पवारांच्या निवासस्थानी ठरणार 'रणनीती'
  3. NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.