ETV Bharat / state

'रोहित आणि राम शिंदेंची भेट हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण' - रोहित आणि राम शिंदेंची भेट

मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही लढाई एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला. समोर विरोधकच नाहीत असे वातावरण त्यांनी केले होते. मात्र आपण जर लोकांच्या पुढे गेलो आपल्या भूमिका आपण पटवून दिल्या तर लोक आपल्याला स्वीकारतात. आपण जर भूमिका मांडली नाही तर लोकांची नाही तर ती आपलीच चूक असते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Oct 25, 2019, 5:50 PM IST

Updated : Oct 25, 2019, 5:57 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकांचे बहुप्रतीक्षीत निकाल काल(24 ऑक्टोबर) जाहीर झाले. यात आघाडीने आश्चर्यकारक विजय मिळवला असून राष्ट्रवादी ५४ जागांवर विजयी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बाग येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, रोहित पवार आणि राम शिंदे भेटीबाबत विचारले असता, पवार म्हणाले "आपण सभ्य लोक आहोत. राजकारणात सुसंस्कृतपणा हवा. निवडणूक पार पडल्यावर राजकारण सोडून द्यावे. शिंदे जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्या वयाचा मान ठेवून रोहित त्यांना भेटला हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण आहे"

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

पुढे बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही लढाई एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला. समोर विरोधकच नाहीत, असे त्यांनी भासवले. मात्र आपण जर लोकांच्या पुढे गेलो, आपल्या भूमिका आपण पटवून दिल्या तर लोक आपल्याला स्वीकारतात. आपण जर भूमिका मांडली नाही तर लोकांची नाही तर ती आपलीच चूक असते.

हेही वाचा - मनसेचं आता काय होणार?

मी आक्रमकपणे भूमिका मांडली आणि ती तरुणांनी उचलून धरली असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच जनतेने पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी लोकांचे आभारही मानले.

Intro:Body:बारामती- मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही लढाई एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला..समोर विरोधकच नाहीत असे वातावरण त्यांनी केले होते. मात्र आपण जर लोकांच्या पुढे गेलो आपल्या भूमिका आपण पटवून दिल्या तर लोक आपल्याला स्वीकारतात..आपण जर भूमिका मांडली नाही तर लोकांची नाही तर आपली चूक असते...मी आक्रमकपणे भूमिका मांडली व ती तरुणांनी उचलून धरली असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बारामती येथील गोविदं बागेत पवारांनी पञकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार व राम शिंदे भेटीबाबत विचारले असता, आपण सभ्य लोक आहोत..राजकारणात सुसंस्कृतपणा हवा निवडणूक पार पडल्यावर राजकारण सोडून द्याव. शिंदे जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्या वडीलकीचा मान ठेवून रोहित त्यांना भेटला हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण असल्याचे पवार म्हणाले,

पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करू विरोधकांना सन्मानजनक जागा दिल्या.आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल लोकांचे आभार मानतो...त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो.Conclusion:
Last Updated : Oct 25, 2019, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.