पुणे - मी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क केला होता, पण संपर्क झाला नाही. शंकरराव पाटील यांनी काँग्रेसचा विचार कधीही सोडला नाही. मात्र, जे लोक निर्णय घेत नाहीत त्यांच्याच घरात इंदापूरमधला गडी जाऊन बसला, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला.
इंदापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तामामा भरणे यांच्या प्राचारार्थ आयोजीत सभेत शरद पवार बोलत होते. १० वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दत्ता मामांनी काम चांगले काम केले आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. इंदापूरच्या विकासासाठी त्यांनी निधी आणला आहे. आपल्याला मतदारसंघातील जनतेच्या हितांची जपणूक करणाऱ्या दत्ता मामांना निवडून आणायचे असल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा; 'त्या' वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
जो थांबला असता त्याच्यावर कधीही अन्याय झाला नसता
हर्षवर्धन पाटील जाताना म्हणाले, की माझ्यावर अन्याय झाला. इंदापूरच्या जागेबाबत माझ्याशी चर्चा केली होती. आपण यातून मार्ग काढू असे मी त्यांना म्हणालो होतो. मी द्त्तात्रय भरणे यांच्याशीही बोललो होतो. मामाही थांबतो म्हणाले होते. जो थांबला असता त्याच्यावर कधीही अन्याय झाला नसता असे पवार म्हणाले.
आम्ही काय केले हा सगळा महाराष्ट्र जाणतो
अमित शाह इथे येऊन विचारतात की, शरद पवार यांनी काय केलं? सत्ता तुमच्या हातात, सर्व क्षमता तुमच्या हातात, मग तुम्ही काय केले? हे सांगा. आम्ही काय केले, हा सगळा महाराष्ट्र जाणत असल्याचे पवार म्हणाले.
दमदाटी केल्यास पाय काढू
येथे दमदाटीचे राजकारण सुरू झालं आहे. ते इथे चालणार नाही. हा गांधी-नेहरूंचे विचार मानणारा जिल्हा आहे. जर दमदाटी करून इथे पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तर पाय काढल्याशिवाय राहणार नसल्याचे पवार म्हणाले.