ETV Bharat / state

B'Day Special : बारामतीकरांनी अनुभवलेले शरद पवार...

author img

By

Published : Dec 12, 2019, 8:23 AM IST

Updated : Dec 12, 2019, 6:58 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील महत्वाचे नाव. सातत्याने त्यांच्याभोवती देशासह राज्याचे राजकारण फिरत असते. बारामतीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद पवारांनी देशाच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा ८० वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्याविषयी बारामतीकरांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न...

sharad pawar birthday special story in baramati
शरद पवार...

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील महत्वाचे नाव. सातत्याने त्यांच्याभोवती देशासह राज्याचे राजकारण फिरत असते. बारामतीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद पवारांनी देशाच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, शेती, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आज त्यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी बारामतीकरांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न...

बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...

बारामतीचं आणि शरद पवारांचं अतूट नातं आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून शरद पवारांना बारामतीकरांनी खंबीरपणे साथ दिली आहे. त्यांच्या पाठीशी आजतागायत बारामतीकर सतत उभे आहेत. शरद पवार असो अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी बारामतीकर नेहमीच ठाम असतात. त्याला कारणही तसंच आहे. पवार कुटुंबीयांनी बारामती सारख्या ग्रामीण भागात जिल्हा पातळीवरील सर्व सुखसोई उपलब्ध करून दिल्या आहेत.

baramati
पिकाची पाहणी करताना शरद पवार

शरद पवारसाहेबांसारखे नेतृत्व आजपर्यंत भारतात झालेलं नाही. भविष्यात होईल असं मला वाटत नसल्याच्या भावना डॉ. मुरलीधर घोळवे यांनी व्यक्त केल्या. त्यांनी सर्व स्तरात म्हणजेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेती या सर्व क्षेञात दूरदृष्टी ठेवून काम केलं आहे. आज देशभरातील पोलीस फूल पँन्टमध्ये आण्याचे व संरक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग, तसेच महिलांना आरक्षण असे मोठे निर्णय शरद पवारांनी घेतल्याचे घोळवे यांनी सांगितले.

Baramati
शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण

पवार साहेब आणि माझ्या वयात २ वर्षाचे अंतर आहे

पवार साहेबांच्या आणि माझ्या वयात दोन वर्षाचे अतंर आहे. आम्ही दोघे एकाच शाळेत एकत्र शिक्षण घेत होतो. बारामतीच्या जडणघडणीत पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बारामतीसह देशभर ऐवढं मोठं काम केलं आहे की, प्रथम बारामती म्हटलं की पवार साहेबांचे नाव निघतं. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. अमरनाथ यात्रेत जेव्हा तेथील गुहेत गेलो तेव्हा तेथे पवार साहेबाचं नाव निघाल्याची रामलिंग बोराटे यांनी सांगितले.

baramati
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे

वयाच्या ८० वर्षीही तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा घेऊन, राज्यासह देशाच्या विकासासाठी शरद पवार हे कार्य करीत आहेत. गगनाएवढे कार्य असूनही त्याचा गर्व न बाळगता आणखी खूप काही करायचे आहे. या भावनेतून ते आजही जमिनीवरच पाय ठेवून कार्य करीत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही गावात लहानापासून थोरापर्यंत नावाने नागरिकांना ओळखणारे देशातील एकमेव नेते शरद पवार हे असावेत, म्हणूनच त्यांना जाणता राजा हे संबोधन शोभून दिसते.

baramati
कार्यकर्त्यांशी चर्चा करताना शरद पवार

Intro:Body:बारामती-
बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार......
 
बारामती सारख्या ग्रामीण भागातून उदयास आलेले नेतृत्व आज देशाच्या राजकारणात गाजत आहे.. हे नेतृत्व म्हणजेच माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार..उपजतच राजकीय पिंड असणाऱ्या पवारांनी केवळ राजकीय क्षेत्रात काम करून आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.. एवढेच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, शेती अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपल्या कार्याची ओळख निर्माण केली आहे..
 
आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा घेऊन, राज्यासह देशाच्या विकासासाठी ते कार्य करीत आहेत. गगना एवढे कार्य असूनही त्याचा गर्व न बाळगता आणखी खूप काही करायचे आहे... या भावनेतून ते आजही जमिनीवरच पाय ठेवून कार्य करीत आहेत.. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही गावात लहानापासून थोरापर्यंत नावाने नागरिकांना ओळखणारे देशातील एकमेव नेते असावेत, म्हणूनच त्यांना जाणता राजा हे संबोधन शोभून दिसते..
 
बारामतीचं आणि शरद पवारांचं अतूट नात आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून शरद पवारांना बारामतीकरांनी खंबीरपणे साथ दिली आहे.. त्यांच्या पाठीशी आजतागायत बारामतीकर सतत उभे आहेत. शरद पवार असो अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी बारामतीकर नेहमीच पाठीशी असतात. त्याला कारणही तसंच आहे बारामती सारख्या ग्रामीण भागात जिल्हा पातळीवरील सर्व सुखसोई येथे बारामतीकरांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
आज शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त  बारामतीकरांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया......
१)     पवार साहेब हे असं नेतृत्व आहे की, भारतात आज तागायत झालेलं नाही. भविष्यात होईल की नाही. असं मला वाटत नाही. त्यांनी सर्व स्तरात म्हणजेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेती या सर्व क्षेञात दुरदुष्टी ठेवून काम केलं आहे. सामाजिक क्षेञात काम करत असताना पवार साहेबांनी दुरदुष्टी ठेवून आज देशभरातील पोलिस फूलपँन्ट मध्ये आण्याचे व संरक्षण क्षेञात महिलांचा सहभाग निर्माण झाला आहे. तर साहेबांच्यामुळे महिलांना आरक्षण मिळाले आहे.
डाँ मुरलीधर घोळवे, बारामती.
२)     पवार साहेबांच्या आणि माझ्या वयात दोन वर्षाचे अतंर आहे. आम्ही दोघे मसओ शाळेत एकञ शिक्षण घेत होतो. बारामतीच्या जडणघडणीत पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बारामतीसह देशभर ऐवढं मोठं काम केलं आहे की, प्रथम बारामती म्हटलं की पवार साहेबांचे नाव निघतं हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. अमरनाथ याञेत जेव्हा तेथील गुहेत गेलो तेव्हा तेथे पवार साहेबाचं नाव निघालं.
रामलिंग बोराटे.नागरिक बारामती.Conclusion:
Last Updated : Dec 12, 2019, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.