ETV Bharat / state

Pune Crime News : गृहमंत्री अमित शाह, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर लैंगिक टोमणे; हर्षवर्धन जाधवांविरुद्ध गुन्हा दाखल

author img

By

Published : Dec 18, 2022, 6:19 PM IST

गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्या बाबत लैंगिक टोमणे मारल्याप्रकरणी (Sexual taunts ) कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (case registered against Harshvardhan Jadhav) यांच्यावर पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्थानकात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सोशल माध्यमावर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विषयी अवमानकारक बोलत त्यांची बदनामी केली. (Latest news from Pune) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विषयी घाणेरडी भाषा वापरत लैंगिक स्वरूपाचा टोमणे मारणारा व्हिडिओ शेअर केला होता. (Pune Crime)

Sexual Taunts On Amit Shah
हर्षवर्धन जाधव

पुणे : सोशल माध्यमावरील शेअर व्हिडिओ पुण्यातील एका महिलेने पाहिल्यानंतर आमदार हर्षवर्धन जाधव () यांच्या विरोधात पुण्यातील दत्तवाडी पोलिसात संबंधित महिलेने गुन्हा दाखल केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्याविषयी अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरून (Sexual taunts) त्यांची बदनामीसुद्धा हर्षवर्धन जाधव (case registered against Harshvardhan Jadhav) यांनी केली आहे. (Pune Crime)

महिलेची पोलिसात तक्रार : कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव हे सध्या मनसेचे नेते आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सुद्धा ते नातेवाईक आहेत. त्यांचे व्हिडिओ सातत्याने सोशल मीडियावर प्रसारित होत असतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी सोशल माध्यमातून टाकला आणि त्या व्हिडिओतली भाषा पुण्यातील एका महिलेने ऐकली. यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या बद्दल लैंगिक टोमणे मारल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. महिलेने या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुन्ह्याची चर्चा जोरात : मनसे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मनसेच्याच नेत्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक झालेली आहे. मनसेच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात अशी भाषा वापरल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.