ETV Bharat / state

वर्गमित्रांनीच विद्यार्थ्याला बदडले, वर्गात प्रश्नांची उत्तरे देतो म्हणून मारहाण केल्याचा आरोप

वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो देत होता. त्यामुळे शिक्षक बाकीच्यांना रागवत होते. चिडलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यालाच बदडले. एवढेच नाही तर गायब करू, अशी धमकीही दिली. हा प्रकार पुण्यातील एका नामांकित शाळेत घडला.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jan 29, 2020, 12:43 PM IST

Updated : Jan 29, 2020, 12:51 PM IST

पुणे - सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुला कशी काय येतात? तुझ्यामुळेच आमच्यावर शिक्षक ओरडतात, असे म्हणत आठवीत शिकणाऱ्या सात अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला बेदम मारहाण केली. ही घटना 22 नोव्हेंबर, 2019 रोजी पुण्याच्या हडपसर परिसरातील नामांकित शाळेत घडली. पीडित मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आपला 15 वर्षीय मुलगा हडपसर परिसरातील नामांकित शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत आरोपी 7 अल्पवयीन मुलांनी पीडित मुलाला पकडले. तुला सगळेच येते, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू का देतोस?, तुझ्यामुळेच शिक्षक आमच्यावर रागवतात, असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि खिडकीच्या पडद्याचा पाईप काढून बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर तुला गायब करून टाकतो, अशी धमकीही दिली,' असे पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे.

हेही वाचा - त्याने दीड लाख तांदळाच्या दाण्यांवर लिहिले 'राम' नाम; गिनीज बुकात नोंद

पीडित मुलाने काही दिवसांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक ए. सी. जोगदंड अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - राजगुरुनगर बसस्थानकात युवकाला गावठी पिस्तूलासह अटक

Intro:सर्वच प्रश्नांची उत्तरं का देतोस, तुझ्यामुळेच आम्हाला शिक्षक ओरडतात..आठवीतील विद्यार्थ्याला वर्गमित्रांचीच मारहाण..सात अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल (फाईल फोटो वापरणे)

सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुला कशी काय येतात? तुझ्यामुळेच आमच्यावर शिक्षक ओरडतात असे म्हणत आठवीत शिकणाऱ्या सात अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला बेदम मारहाण केली. ही घटना (२२ नोव्हेंबर २०१९ ) रोजी पुण्याच्या हडपसर परिसरातील नामांकित शाळेत घडली. पीडित मुलाच्या वडिल राशीद सिद्दीकी (वय ४५) याप्रकरणी फिर्याद दिली असून वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्दीकी यांचा १५ वर्षीय मुलगा हडपसर परिसरातील नामांकीत शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत आरोपी सात अल्पवयीन मुलांनी पीडित मुलाला पकडले आणि ' तुला सगळंच येतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू का देतोस? तुझ्यामुळेच शिक्षक आमच्यावर रागावतात' असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि खिडकीच्या पडद्याचा पाईप काढून बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर तुला गायब करून टाकतो अशी धमकी दिली.

पीडित मुलाने काही दिवसांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक ए सी जोगदंड अधिक तपास करीत आहेत.

Body:।।Conclusion:।।
Last Updated : Jan 29, 2020, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.